अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी गुप्त सेवा विभागाच्या संचालकपदी ज्युलिया पिअरसन यांची नियुक्ती केली आह़े  या पदावर बसणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत़  प्रामुख्याने राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी या विभागाकडे असत़े
या पदावर बसण्यासाठी ज्युलिया यांनी अनेक खडतर परीक्षा पार केल्या़  राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत संरक्षण देण्याबरोबर, मोठय़ा संकटांच्या वेळी अमेरिकी जनतेच्या सुरक्षेची काळजी घेणे, अमेरिकेच्या आर्थिक यंत्रणेचे संरक्षण आणि बडय़ा नेत्यांच्या संरक्षण अशी अत्यंत जोखमीची कामे या विभागाकडे असतात, अशी माहिती ओबामा यांनी मंगळवारी निवेदनाद्वारे दिली़  ज्युलिया यांची आतापर्यंत कारकीर्द आदर्श होती आणि या कार्यकाळातील त्यांच्या अनुभवांचा उपयोग नवी जबाबदारी पेलण्यासाठी होऊ शकेल, असेही ओबामा यांनी नियुक्तीची घोषणा करताना म्हटले आह़े ज्युलिया सध्या गुप्त सेवा विभाग संचालकांच्या कार्यालयीन कर्मचारी विभागाच्या प्रमुख आहेत़  त्याआधी २००६ ते २००८ या काळात त्यांनी याच कार्यालयात मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागाच्या सहाय्यक संचालिका म्हणून काम पाहिले आह़े  .त्यांनी १९८३ साली या विभागात, मिआमी येथील ‘विशेष हस्तक’ म्हणून कामाला सुरुवात केली होती़ .

Story img Loader