प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी नवी दिल्लीतील सुरक्षाव्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे २५ हजार कर्मचारी नवी दिल्लीमध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
प्रजासत्ताक दिनाचे संचलन होणाऱया राजपथावर जमिनीपासून आकाशापर्यंत सर्व ठिकाणांहून लक्ष ठेवण्यात येणार आहे. रायसीना हिलपासून लाल किल्ल्यापर्यंत ८ किलोमीटरपर्यंतच्या मार्गावर दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाचे सुरक्षेचे कडे उभारण्यात आले आहे. या संपूर्ण परिसरात १६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, राजपथ आणि लालकिल्ला परिसरात होणाऱया सर्व प्रकारच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल. मध्यवर्ती नियंत्रण कक्षात सीसीटीव्ही कॅमेऱयांद्वारे मिळालेल्या चित्रीकरणाचा वरिष्ठ अधिकाऱयांकडून सातत्याने आढावा घेण्यात येणार आहे. तसेच या संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी मेटल डिटेक्टर आणि प्रशिक्षित कुत्रीही तैनात करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा