केंद्र सरकारने बुधवारी रात्री उशीरा पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली आहे. केंद्राचा निर्णय आल्यानंतर देशातील काही राज्यांनी राज्य सरकारकडून इंधनावर आकारला जाणार व्हॅट ( मूल्यवर्धित कर ) कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे एकंदरीतच देशातील पेट्रोल, डिझेलचे दर हे कमी झाले आहेत. काही प्रमुख शहरांतही इंधनाचे दर हे काही प्रमाणात कमी झालेत.

राजधानी दिल्लीत सध्या पेट्रोलचा दर हा प्रति लिटर ११० रुपये ४ पैसे यावरुन खाली येत १०३ रुपये ९७ पैसे एवढा झाला आहे. तर डिझेलची किंमत प्रति लिटर ९८.४२ रुपयांवरुन ८६.६७ रुपयांवर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर हा ५ रुपये ८७ पैशांनी कमी झाल्याने आता पेट्रोल १०९.९८ रुपयांना उपलब्ध आहे तर डिझेल हे ९४.१४ रुपयांना मिळत आहे. कोलकत्ता इथे पेट्रोलसाठी १०४.६७ रुपये तर डिझेलसाठी ८९.७९ रुपये मोजावे लागत आहेत. तर चैन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०१.४० आणि डिझेलचा दर ९१.४३ रुपये एवढा झाला आहे. बंगळूरुमध्ये पेट्रोलसाठी १०७.६४ रुपये तर डिझेलसाठी ९२.०३ रुपये लागणार आहेत.अहमदाबादमध्ये पेट्रोल प्रति लिटर ९५.१३ रुपयांना तर डिझेल ८९.१२ रुपये एवढं आहे. लखनौला पेट्रोलची किंमत १०१.०५ रुपये तर डिझेलची किंमत ८७.०९ रुपये एवढी झाली आहे.

देशात मुख्य इंधन असलेल्या पेट्रोल आणि डिझेलचे दर हे शंभरीपार झाल्याने गेल्या काही दिवसांत वातावरण ढवळून निघाले होते. केंद्र सरकारवर विरोधी पक्षांनी सडकून टीका केली होती.

Story img Loader