पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय तरुण सचिन मीना यांची लव्हस्टोरी सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय आहे. हे जोडपं अलीकडेच उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे नवीन घरात राहायला गेलं आहे. येथे आल्यानंतर सीमा हैदर आणि सचिन मीना यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. घरात अन्नधान्य आणि इतर दैनंदिन वस्तूंची कमतरता जाणवत असून हे जोडपं उदरनिर्वाहासाठी धडपड करत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिनकडे कोणतीही नोकरी नसल्यामुळे त्याच्या कुटुंबाला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत सीमाने सांगितलं की, बेकायदेशीरपणे भारतात आल्यामुळे तपास यंत्रणांकडून माझी चौकशी सुरू आहे. यामुळे माझ्या सासू-सासऱ्यांनाही विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सचिनच्या कुटुंबाला होणाऱ्या त्रासामुळे मी व्यथित झाली आहे.

हेही वाचा- “तर मी माझ्या मुलांसोबत…” सीमा हैदर पाकिस्तानी गुप्तहेर आहे? आरोप करणाऱ्यांना सचिनच्या प्रेयसीने दिलं उत्तर, म्हणाली…

खरं तर, पाकिस्तानी महिला सीमा हैदरने तिचा प्रियकर सचिनशी लग्न करण्यासाठी बेकायदेशीरपणे भारतीय सीमा ओलांडली. ऑनलाइन मोबाइल गेम PUBG च्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. ४ जुलै रोजी पोलिसांनी सीमा हैदरला ताब्यात घेतलं. तेव्हापासून सीमा पाकिस्तानी गुप्तहेर असल्याच्या संशयावरून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे.

हेही वाचा- अंजूच्या निकाहाबाबत काय म्हणाली सीमा हैदर?, “पाकिस्तानात कळलं असतं की हिंदू…”

दरम्यान, भारतीय किसान युनियन लोकशक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष मास्टर स्वराज यांनी शनिवारी ग्रेटर नोएडा येथील सीमा-सचिन यांची भेट घेतली. यावेळी मास्टर स्वराज म्हणाले, “मी सचिन मीना आणि सीमा हैदर यांना भेटायला आलो आहे. ते ग्रेटर नोएडा येथे नवीन ठिकाणी राहायला आले आहेत. सध्या ते त्यांच्याच घरात अडकल्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्या घराबाहेर रांगा लावून बसतात. त्यामुळे त्यांना घराबाहेर जाणं कठीण होतं आहे. दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करायलाही त्यांना घराबाहेर जाता येत नाहीये.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seema haider and sachin meena lovestory couple facing shortages of food and other necessary items rmm
Show comments