नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘एनडीए’तील घटक पक्षांना विश्वासात घेऊन केंद्रातील मोदी ३.० सरकारचा मार्ग सुकर केला. पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत मोदींची ‘एनडीए’च्या प्रमुखपदी एकमताने नियुक्ती करण्यात आली. या बैठकीमध्ये, केंद्रात सरकार स्थापनेचा दावा तातडीने करण्याची विनंती मोदींना करण्यात आली. ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या नेत्यांनी मोदींना पाठिंब्याचे लेखी पत्रही दिले असून मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शनिवारी ८ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला बहुमताचा २७२ चा आकडा गाठता आला नसल्याने मोदी ‘एनडीए’च्या पाठिंब्यावर अवलंबून आहेत. दुसऱ्या बाजूला; विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून ‘एनडीए’तील जनता दल (सं)चे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार तसेच तेलुगु देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना संपर्क केला जात होता. या दोन्हीपैकी एकाही घटक पक्षाने भाजपला पाठिंबा देण्यास नकार दिला असता तर े राजकीय अस्थिरता निर्माण होण्याचा धोका होता. त्यामुळे पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी रात्रीच नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता व एनडीएच्या बैठकीमध्ये सरकार स्थापनेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याची विनंती केली होती.

Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत

हेही वाचा >>>‘मोदींना धक्का,’ ‘अजिंक्यतेचं आभाळ कोसळलं अन्..’ जागतिक वृत्तपत्रांनी नरेंद्र मोदी, भाजपाबाबत निकालानंतर काय छापलं?

मोदी काळजीवाहू पंतप्रधान

मोदींनी बुधवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची अखेरची बैठक घेतली. आघाडी सरकारचे नेतृत्व करण्याचा अनुभव असल्याने केंद्रातील सरकार आघाडीचे असले तरी नीट कारभार करता येऊ शकेल, अशी ग्वाही मोदींनी मावळत्या सरकारमधील सहकारी मंत्र्यांना दिल्याचे समजते.

जनता दल, तेलुगु देशमकडून ग्वाही

मोदींच्या ७ लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी एनडीएच्या तासभर झालेल्या बैठकीत नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू या दोन्ही प्रमुख घटक पक्षांच्या नेत्यांनी भाजपला सरकार बनवण्यासाठी पाठिंब्याचे लेखी पत्र दिले. बैठकीमध्ये नितीशकुमार यांनी मोदींना लगेचच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्याची सूचना केली. ‘एनडीए’ बरोबर असल्याची ग्वाही नायडू यांनी दिल्लीत येण्यापूर्वी विजयवाडा येथे दिली.