स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसारामबापू यांचा मुलगा नारायण साई याला अखेर आज (बुधवार) सकाळी दिल्ली-पंजाब सीमेवरू अटक करण्यात आली. पोलीस गेल्या दोन महिन्यांपासून नारायण साईच्या शोधात होते.
युवतींना जाळ्यात ओढण्यासाठी नारायण साईचा ‘कोड वर्ड’!
दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे विभाग) रविंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीख नागरिकाचा पेहराव करून नारायण साई पळून जात असल्याची माहिती गुप्तहेरांकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून दिल्ली-पंजाब सीमेवर नारायण साई, त्याचा साथीदार हनुमान आणि इतर तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
गर्भपातासाठी आसाराम बापूंचा पीडित महिलांवर दबाव
आसाराम आणि त्यांच्या मुलाविरुद्ध सुरतमधील दोन बहिणींनी लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून नारायण साई फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी सुरत पोलिसांनी देशभरात सर्वत्र पोलीस पथके रवाना केली होती. तक्रार दाखल करून दोन महिने उलटले तरी नारायण साईचा काही सुगावा पोलिसांना लागत नव्हता. पोलीस ठिकठिकाणी आसाराम बापूंच्या आश्रमांवर छापे मारत होते. काही दिवसांपूर्वी त्याने राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आश्रय घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, तेथे पोहोचण्यापूर्वीच नारायण साई तेथून पळाला होता. त्यानंतर आता त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नारायण साईकडून निर्दोष असल्याच्या जाहिराती

Story img Loader