डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांची मागणी
देशातील बेरोजगारी आणि औद्योगिक उपक्रम कोलमडून पडण्यास रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन जबाबदार असल्याने त्यांची या पदावरून उचलबांगडी करावी, अशी सूचना भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी गुरुवारी येथे केली.
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर देशासाठी योग्य नाहीत, असे आपले मत आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला अधिक भाष्य करावयाचे नाही, महागाई रोखण्यासाठी त्यांनी व्याजाचे दर वाढविले आणि त्यामुळे देशाचे नुकसान झाले, असे डॉ. स्वामी यांनी येथे वार्ताहरांना
सांगितले.
गव्हर्नरच्या कृतींमुळे औद्योगिक उपक्रम कोलमडले आणि अर्थव्यवस्थेत बेरोजगारी वाढली, त्यामुळे त्यांना शक्य तितक्या लवकर शिकागोला पाठविणे उचित ठरेल, असे डॉ. स्वामी म्हणाले. राजन हे शिकागोतील बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अर्थविषयाचे प्राध्यापक होते.
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदर वाढविले, अर्थमंत्रालय आणि उद्योगसमूहांकडून दबाव असतानाही महागाईचे कारण देऊन त्यांनी व्याजदर तसेच ठेवले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा