Senegal Bus Crash : सेनेगल देशात दोन बसेस यांची समोरसमोर धडक झाल्यामुळे तब्बल ४० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर येथे तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
अपघाताचं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार सेनेगलमधील कॅफ्रीन भागातील ग्निवी गावात राष्ट्रीय मार्ग क्रमाक १ वर घडला आहे. यातील एका सार्वजनिक बसचे टायर पंक्चर झाल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. परिणामी पहिली बस समोर येणाऱ्या दुसऱ्या बसवर आदळली. या भीषण अपघाताचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत.
आणखी वाचा – ब्राझीलमधील लोकशाही धोक्यात? संसद, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती भवनावर आंदोलकांचा हल्ला
दरम्यान, या घटनेनंतर येथील राष्ट्राध्यक्ष मॅकी शाल यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेचा तपास केला जाणार असून आगामी काळात अशा घटना घडू नयेत म्हणून रस्त्यावरील सुरक्षेसाठी काय करता येईल? यावर चर्चा करण्यासाठी मंत्रीमंडळ बैठक आयोजित केली जाईल, अशी माहिती मॅकी शाल यांनी दिली.