वीज पुरवठा खंडित झाल्याच्या कारणास्तव झारखंडमधील वीज मंडळाच्या अधिकाऱयांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला.
लालकृष्ण अडवाणी यांनी मंगळवारीच यशवंत सिन्हा यांची तुरुंगात भेट घेतली होती. सिन्हा यांनी जामीन घेऊन झारखंडमधील जे विजेचे संकट आहे, त्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करावे, असे आवाहन अडवाणींनी केले. त्यानंतर जामीनासाठी अर्ज केल्यावर न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला.
सिन्हा यांनी छोटय़ा गावातून वीज संकटाच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली. गरीबांच्या भल्यासाठी हे आंदोलन असल्याने त्यांना व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे अडवाणी यांनी सांगितले. आतापर्यंत भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यांनी इतके व्यापक आंदोलन केले नसल्याचे अडवाणी यांनी सांगितले. झारखंडचे नेतृत्व करण्याची क्षमता सिन्हा यांच्यात असल्याचे अडवाणी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा