केंद्रातील सत्ताधारी यूपीए सरकार पाडण्यासाठी एका ज्येष्ठ नेत्याने आपली भेट घेतली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केलाय. 
गडकरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना संबंधित नेता हा सातत्याने त्यांच्या संपर्कात होता. त्यावेळी त्याने सरकार पाडण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, गडकरी यांनी त्याची मागणी साफपणे फेटाळली होती. त्या व्यक्तीचे नाव गडकरींनी स्पष्ट केलेले नाही. मला जे काही करायचे आहे, ते सर्वांसमोरच करेन, असे आपण त्या व्यक्तीला सांगितल्याचेही गडकरींनी स्पष्ट केले.
गडकरी यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत बोलताना ते म्हणाले, मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱयांनी माझ्या पूर्ती समूहातील कंपन्यांची चौकशी केली आहे.