दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी काल (बुधवार) विक्रमी मतदान झाल्यानंतर आज (गुरूवार) दिवसाच्या प्रारंभीच तेजी नोंदवत भांडवली बाजाराने उच्चांकस्तर गाठला. दुसऱया तिमाहीतील अपेक्षेपेक्षा चांगल्या आर्थिक विकासदराचे स्वागत करताना सेन्सेक्स ४३९ अंश वाढ नोंदवत २१,१४८.२६ वर पोहोचला.
देशात सध्या निवडणुकीचे वातावरण असताना दिल्ली विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणावर मतदान झाल्याने ‘सत्ताविरोधी लाट आली’ हा पारंपरिक समज यंदाही खरा होण्याची शक्यता आहे. वाढलेली टक्केवारी जशी ऐतिहासिक आहे तशीच भाजप व काँग्रेसव्यतिरिक्त आम आदमी पक्षाच्या रूपाने तिसरा पर्याय दिल्लीकरांसमोर आला, तोदेखील पहिल्यांदाच. त्याचबरोबर विविध वृत्तवाहिन्या/वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणानुसार, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि छत्तीसगढ या चार राज्यांत भाजप हा सत्ताधारी किंवा सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडीवर राहणार असल्याचे म्हटल्यानंतर भांडवली बाजारालाही देशात सत्ताबदल हवा आहे की काय? असा प्रश्न निर्माण व्हावा अशा रितीने आज सेन्सेक्सनेही तेजीचा बैल उधळला आहे.
मागील महिन्याच्या ३ नोव्हेंबर रोजी सेन्सेक्स २१,३२१.५३ अशी भरारी घेतली होती. ती यावेळी काही अंशांनी हुकली आणि आज दिवसाच्या सुरूवातीला सेन्सेक्सने २१.१४८.२६ पर्यंत सकारात्मक मजल मारली

Story img Loader