Punjab Serial Killer Arrested : पंजाब पोलि‍सांनी सोमवारी एका व्यक्तीला १८ महिन्यात ११ जणांची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. होशीपूर जिल्ह्यातील चौरा गावचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीचे नाव राम सरूप ऊर्फ सोढी असे आहे. चौकशीदरम्यान ३१ वर्षीय राम सरूपने तो एक ‘सिरियल किलर’ असल्याचे कबुल केले आहे. इतकेच नाही तर त्याने ११ पुरुषांची हत्या केल्याची माहिती देखील दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरूप याचे बळी ठरलेले बहुतांश पीडित हे पुरूष आहेत ज्यांना लिफ्ट देऊन किंवा लैंगिक कृत्यांमध्ये गुंतवून त्यांची हत्या करण्यात आली. सरूप याने काही जणांची गळा दाबून तर काही प्रकरणात हत्येसाठी विटांचा वापर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या हत्यांमागील कारण साधारणपणे वाद किंवा पैसे देण्यास नकार देणे असल्याचे सांगितले जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार सरूप हा पुरूषांना लिफ्ट द्यायचा आणि जर त्यांनी नकार दिला तर तो त्यांना लुटून त्यांची हत्या करत असे. एका प्रकरणात सिरीयल किलर स्वरूपने एका पीडिताच्या पाठीवर धोकेबाज असे देखील लिहिले होते. सरूप हा माजी सैनिक असून तो पंजाबमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो होता.

एसपी नवनीत सिंग महल यांनी माहिती दिली की, “बहुतेक प्रकरणांमध्ये सरूपने कापडाच्या तुकड्याने त्याच्या त्याच्या बळींचा गळा आवळला, तरीही काही घटनांमध्ये विटांसारख्या बोथट वस्तूंमुळे डोक्याला मार लागल्याने पीडितांचा मृत्यू झाला”.

“आरोपीचे लग्न झालेले असून त्याला तीन मुले आहेत. आरोपीला समलैंगिकतेमुळे त्याच्या कुटुंबाने दोन वर्षांपूर्वी सोडून दिले होते. त्याला एचआयव्हीची लागण झाली आहे का हे तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल ,” असेही एसपी महल यांनी सांगितेल.

हेही वाचा>> छगन भुजबळ हे अजित पवार गटात राहतील की नाही? ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “काहीही होऊ…”

सिरियल किलरला अटक कशी झाली?

सरूप याला सुरूवातीला किर्तारपूर साहिब येथील एका खून प्रकरणात अटक करण्यात आली होती चौकशीत त्याने आणखी १० जणांची हत्या केल्याची कबुली दिली. या हत्या पंजाबच्या रुपनगर, फतेहगढ साहिब आणि होशियारपूरमध्ये गेल्या १८ महिन्यांत हत्या झाल्या आहेत.

कर्तारपूर साहिब येथील मनिंदर सिंग या ३७ वर्षीय व्यक्ती स्वरूप याचा बळी ठरला होता. जो मोदरा टोल प्लाझा येथे चहा-पाणी देत ​​असे. १८ ऑगस्ट रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान आतापर्यंत पाच घटनांची पुष्टी झाली आहे, तर इतर खूनाच्या घटनांचा तपास पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serial killer ram saroop who murdered 11 in 18 months arrested by punjab police rak