आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी मोदी सरकारच्या काळात ईडीने केलेल्या कारवायांचा लेखाजोखा मांडत जोरदार हल्ला चढवला आहे. ईडीने मागील आठ वर्षात एकूण तीन हजार छापे मारले, मात्र केवळ २३ जणांना दोषी सिद्ध करता आलं आहे, असा आरोप संजय सिंह यांनी केला. तसेच ईडी २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीबाबत शांत का बसते? असा सवाल केला. ते सोमवारी (१२ डिसेंबर) राज्यसभेत बोलत होते.

संजय सिंह म्हणाले, “मागील आठ वर्षात ईडीचा वापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात ३००० छापे टाकण्यात आले. या ३००० पैकी ईडीला केवळ २३ जणांना दोषी सिद्ध करता आलं आहे. आरोप सिद्ध होण्याचं हे प्रमाण केवळ ०.५ टक्के इतकं आहे. ही ईडी २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीविरोधात का शांत बसते?”

maharashtra election 2024 yogi adityanath fact check viral video
भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ बुलडोझर घेऊन उतरले मैदानात! लोकांना हात जोडून केलं मतदानाचं आवाहन? Video खरा पण…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Supriya Sule asked why the investigative agencies are misusing power
सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांचा ससेमिरा कशासाठी; सुळे यांचा सवाल
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

“खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या प्रश्नावर सरकारने उत्तर देताना सांगितलं की, ईडीने एकूण ३००० छापे टाकले आणि केवळ २३ लोकं दोषी सिद्ध झालेत,” असंही संजय सिंह यांनी नमूद केलं.

व्हिडीओ पाहा :

संजय सिंह पुढे म्हणाले, “माझा यांना प्रश्न आहे की, हीच ईडी आणि सीबीआय २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या लुटारू नीरव मोदीवर कारवाई करत नाही. विजय माल्ल्यावर कारवाई केली जात नाही, नितीन संदेशरावर कारवाई होत नाही, ललित मोदीवर कारवाई केली जात नाही, रेड्डी ब्रदर्सवर कारवाई केली जात नाही, येडीयरुप्पावर कारवाई होत नाही, व्यापम घोटाळ्यात कारवाई होत नाही.”

“जेवढे भ्रष्टाचारी सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत त्यांच्यावर कारवाई करत नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत राज्यसभेत बसले आहेत, त्यांना ई़डी कारवाईनंतर १०० दिवस तुरुंगात राहावं लागलं. मनिष सिसोदियांच्या घरावर यांनी १४ तास छापेमारी केली. सत्येंद्र जैन यांना तुरुंगात ठेवण्यात आलं. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर छापे टाकले जात आहेत. सर्व विरोधकांवर छापे मारण्यात येत आहे. त्यांनी सर्वांना अटक करून तुरुंगात टाकावं,” असं म्हणत संजय सिंह यांनी आपला संताप व्यक्त केला.

हेही वाचा : VIDEO: “आपल्या ताई मोठ्या हुशार निघाल्या, त्यांनी मोदींना राखी बांधली आणि…”, उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर गंभीर आरोप

“सरकारला दादागिरी करून, हुकुमशाही पद्धतीने, एकाधिकार पद्धतीने देश चालवायचा असेल, तर त्यांनी सर्वांना तुरुंगात टाकावं. विरोधी पक्ष बंद करून टाकावा. संजय राऊतांना १०० दिवस तुरुंगात ठेवलं आणि नंतर म्हटले ही अटक बेकायदेशीर आहे,” असंही संजय सिंह यांनी नमूद केलं.