भारतामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सर्वात आधी परवानगी मिळालेल्या पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता फेटाळली आहे. डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याबाबत राजकारणी थापा मारत आहेत, असा टोला पूनावाला यांनी लगावला आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. तसेच सध्या चर्चेत असणाऱ्या लसींचं कॉकटेल करणं चुकीचं असल्याचं मतही पूनावाला यांनी व्यक्त केलं आहे.
“लसींचे कॉकटेल करणे चुकीचे. १८ वर्षांखालील मुलांना कोविशिल्ड देणार नाही. ते धोकादायक आहे,” असं पूनावाला यांनी म्हटलं आहे. तसेच लसीकरणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता पूनावाला यांनी, “राजकारणी डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याच्या थापा मारतात,” असं रोकठोक उत्तर दिलं. वर्षाअखेरीसपर्यंत लसीकरण होईल आणि सप्टेंबर पर्यंत ४५ कोटी लस मिळतील असे सांगितले जात आहे. त्यावर पूनावाला म्हणाले की, “राजकारणी लोक हेच थापा मारतात, आम्ही महिन्याला १० कोटी लसींचं उत्पादन घेतलं आहे. हे काही सोपे काम नाही. यामध्ये कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक केली आहे. आम्ही महिन्याला १० कोटी प्रमाणे वर्षाला ११० ते १२० कोटी होईल. तसेच इतर कंपन्यांच्या आकडेवारीवरून देखील स्पष्ट होईल की किती लस उपलब्ध होईल.” मृत्यूदर कमी असल्याने लॉकडाउन लावला जाऊ नये असंही पूनावाला म्हणाले. १५० देश लसीची वाट पाहात असून मोदी सरकारने लसींच्या निर्यातीला परवनगी द्यायला हवी, अशी मागणीही पूनावाला यांनी केली आहे.
नक्की वाचा >> ‘सिरम’चे सायरस पूनावाला म्हणतात, “पुण्याला सर्वाधिक लस देण्यास आम्ही तयार पण मोदी सरकारने…”
करोना परिस्थिती हाताळण्यात आपण अपयशी ठरलो आहे का?, त्यावरही पूनावाला यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, “सर्वांना अपेक्षा की आम्हाला लस पाहिजे. पण हे काही सोपे नाही. आमच्याकडे आम्ही २० लसी तयार करायचो ज्या १५ कोटीपर्यंत होत्या. पण आता आम्ही करोना लसीचे उत्पादन १५ कोटींवर घेऊन गेलो आहे. त्यामुळे इतर लसीचे काही प्रमाणात उत्पादन कमी केले आहे, आम्हाला देशाची काळजी आहे.”
कोणी केलेला डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होण्याचा दावा?
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोदी सरकारच्या वतीने देशातील संपूर्ण लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असा दावा केलेला. “देशात आत्तापर्यंत तीन टक्के लसीकरण झाले असले तरी, करोना प्रतिबंधक लशींच्या २१६ कोटी मात्रा डिसेंबरपर्यंत दिल्या जातील, म्हणजेच १०८ कोटी नागरिकांचे लसीकरण पुढील सहा महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही जावडेकरांनी दिलेली. लसीकरणासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशींचा वापर केला जात आहे. शिवाय, झायडस कॅडिला कंपनीची लस, नोव्हाव्हॅक्स, स्पुटनिक, जनोव्हा या लशी उपलब्ध होतील. परदेशी लशीही देशात मिळू शकतील. एकूण २१६ कोटी लशींचे उत्पादन केले जाणार असल्याने २०२१ संपण्यापूर्वी संपूर्ण लसीकरण केले जाईल, असं जावडेकर म्हणाले होते.
नक्की वाचा >> …म्हणून Covishield चा तिसरा डोस घ्यावाच लागणार; सायरस पूनावालांनी सांगितलं कारण
मी पैसा कमावायला बसलेलो नाही…
करोना काळात ज्यांचा मृत्यू झाला त्यांना वेळेत उपचार मिळाले नाही किंवा त्यांच्याकडे पैसे नव्हते. देवाचा कोप होईल या भीतीने काहींनी उपचार नाकारले ज्यात त्यांचा मृत्यू झाला. पण लक्षणे दिसताच लगेच उपचार घेतल्यास लवकर बरे होण्यास मदत होईल. मला लोकांच्या दु:खातून पैसे कमवायाचे नाहीत. मी लस विकून पैसे बनवायला बसलेलो नाही. मात्र लोकांनी लस घ्यावी, असंही ते म्हणालेत.
लॉकडाउन नको…
राज्य सरकारने करोना लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केलेले असतानाच पूनावाला यांनीही आता पुन्हा पुन्हा लॉकडाउन नको अशी भूमिका मांडली आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना पूनावाला यांनी लॉकडाउन हा जास्त नागरिकांचा मृत्यू होत असेल अशा संकाटाच्या कालावधीमध्येच लावावा असं मत व्यक्त केलं आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पारितोषिक यंदा कोविशिल्ड ही करोनाची लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार पूनावाला यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पूनावाला बोलत होते.
सरकारने प्रोत्साहन दिले…
पूर्वी कोणत्याही परवानग्या मिळविताना नोकरशाहचा खूप जाच व्हायचा आता कमी झाला असून याचं श्रेय मोदी सरकारला आहे, असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे. सिरमचा आजवरचा प्रवास खूप परिश्रमाचा आणि वेदनादायी राहिला आहे. मात्र आता पतिस्थिती बदलली आहे. करोनावरील लस बनवण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारच्या परवानग्या तात्काळ मिळल्या. त्याचप्रमाणे सरकारकडून प्रोत्साहन देखील मिळाले आहे. कोविशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे. अतिशय माफक दरात आम्ही ही लस देत आहोत, असंही यावेळी पूनावाला यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही अनेक लशी एका चहाच्या कपाच्या इतक्या नाममात्र किमतीत दिल्या आहेत, असंही पूनावाला यांनी म्हटलंय.
मोदी सरकारचं उत्तर आलं नाही
करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांचा आणि जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याचे अर्थचक्र फिरवणाऱ्या या दोन महत्वाच्या शहरांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आलेले. पुण्यामधील रुग्णसंख्या तर मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं चित्र मध्यंतरी निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. मात्र त्यावर काही ठोस निर्णय झाला नाही. तरी यासंदर्भातील एक मोठा खुलासा आता पूनावाला यांनी केला आहे. पुण्यामध्ये सर्वाधिक करोना रुग्ण असल्याचं अहवालामधून दिसून आल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबद्दल विचारणार केली होती. मात्र केंद्रातील मोदी सरकारने त्यावर काहीच उत्तर दिलं नसल्याचं सायरस पूनावाला म्हणाले आहेत. राज्यामध्ये अनलॉकदरम्यान पुण्यामधील निर्बंध शिथिल न करण्यात आल्याने मागील आठवड्यामध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पुण्यामध्येही निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. मात्र पुण्यातील रुग्णसंख्येचा विचार करुन आधी सूट देण्यात आली नसल्याचं दिलासा दिला नसल्याचं सांगण्यात आलेलं. यावरुनचा वाद शांत होत असतानाच आता सायरस पूनावाला यांनी मोदी सरकारनेच पुण्याला प्राधान्य क्रमाने लसींचा पुरवठा करण्यासंदर्भात काहीच उत्तर न दिल्याचं म्हटलं आहे.
झाली पत्नीची आठवण
आत्तापर्यंत देशाविदेशात अनेक पुरस्कार मिळाले. पण लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार विशेष आहे. टिळकांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आत्तापर्यंत ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्या तुलनेत मी काही नाही. आजवरचा प्रवास खूप वेदनादायी होता. आता तो कौतुकास्पद ठरला असून दिवंगत प्रिय पत्नी विलू यांना पुरस्कार अर्पण करतो, अशा शब्दांमध्ये पूनावाला यांनी या पुरस्काराबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.