कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जसजशा तोंडावर येऊ लागल्या आहेत, तसतसा भाजपच्या जगदीश शेट्टार सरकारपुढील अडचणींचा डोंगर वाढत चालल्याचे दिसत आहे. राज्याच्या आणखी दोन मंत्र्यांनी बुधवारी राजीनामा देऊन शेट्टार यांना चांगलाच धक्का दिला. हे दोन्ही मंत्री काँग्रेस-प्रवेशाच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात येते.
वनमंत्री सी. पी. योगेश्वर आणि लघुउद्योगमंत्री राजुगौडा ऊर्फ नरसिंह नायक अशी या मंत्र्यांची नावे आहेत. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांचीही ‘सदिच्छा’ भेट घेतली.
आपण भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याचे या दोन्ही मंत्र्यांनी सांगितले.

Story img Loader