मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी भारताच्या विविध राज्यांमधील सात विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक होत आहेत. काही महिन्यांनंतर पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांआधी या पोटनिवडणुकांकडे एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी या दोहोंमध्ये छोटीशी चाचणी म्हणून पाहिले जात आहे. सातपैकी पाच ठिकाणी विद्यमान आमदारांचे दुःखद निधन झाल्यामुळे निवडणूक होत आहे; तर दोन ठिकाणी आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे या जागा रिकाम्या झाल्या होत्या. झारखंडमधील डुमरी, केरळामधील पुथुप्पली, त्रिपुरामधील बोक्सानगर व धनपूर, उत्तराखंडमधील बागेश्वर, उत्तर प्रदेशमधील घोसी आणि पश्चिम बंगालमधील धुपगुडी या मतदारसंघांत पोटनिवडणूक होत आहे.

उद्या (ता. ५ सप्टेंबर) मतदान झाल्यानंतर शुक्रवारी (ता. ८ सप्टेंबर) मतमोजणी होणार आहे. या सात मतदारसंघांत विद्यमान आमदार कुणाचा होता? आघाडी किंवा युतीकडून कुणाला उमेदवारी मिळाली आहे? याबाबत घेतलेला सविस्तर आढावा…

pm modi criticizes congress divisive politics
विभाजनवादी राजकारणाचा पराभव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका; भाजप मुख्यालयात जल्लोष
Wayanad byelection result 2024 congress priyanka gandhi won Rahul Gandhi thanked the people of Wayanad
वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींनी मोडला राहुल गांधींचा रेकॉर्ड;…
Hemant Soren jharkhand election 2024
Jharkhand Vidhan Sabha Election Result : भाजपावर JMM भारी; झारखंडमध्ये एनडीएचा दारूण पराभव!
Jharkhand Election Results 2024 Live Updates
Jharkhand : झारखंडमध्ये आजी-माजी मुख्यमंत्री आघाडीवर, JMM आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत!
Priyanka Gandhi waynad bypoll election 2024
Wayanad : वायनाडमध्ये प्रियांका गांधी लाखभर मतांनी आघाडीवर; भाजपाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर
bjp president jp nadda accuses congress for spreading wrong narrative about manipur
मणिपूरबाबत चुकीचे कथानक पसरवले; भाजप अध्यक्ष नड्डा यांचा काँग्रेसवर आरोप
states denied allegations industrialist gautam adani bribe government officials
अदानी लाचखोरीप्रकरणी राज्यांनी आरोप फेटाळले
canada denies report on modi amit shah jaishankar doval role in nijjar killing
हिंसेशी मोदी, शहांचा संबंध नाही! कॅनडाचे स्पष्टीकरण, वृत्त काल्पनिक आणि खोटे असल्याचे निवेदन प्रसिद्ध

हे वाचा >> आघाड्यांचा आजवरचा इतिहास काय सांगतो?

डुमरी, झारखंड

आमदार जगरनाथ महतो (Jagarnath Mahto) यांच्या मृत्यूपश्चात या मतदारसंघात निवडणूक होत आहे. झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे आमदार असलेले महतो झारखंडच्या २००५ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून विधानसभेचे प्रतिनिधित्व करीत होते. २०१९ साली ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन (AJSU) पक्षाच्या यशोदा देवी यांचा ३४ हजार मतांनी पराभव करून महतो जिंकून आले होते. झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आता इंडिया आघाडीचा घटकपक्ष आहे. त्यांनी महतो यांच्या पत्नी बेबी देवी यांना निवडणुकीत उतरवले आहे. महतो यांच्या मृत्यूनंतर बेबी देवी यांच्याकडे (जुलै २०२३) महतो यांच्या शिक्षण आणि उत्पादन शुल्क राज्यमंत्रीपदाचा कारभार सोपविण्यात आला होता.

‘एजेएसयू’ने पुन्हा एकदा यशोदा देवी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मात्र, यावेळी भाजपाने आपला उमेदवार रिंगणात न उतरवता एनडीएच्या वतीने त्यांना पाठिंबा देऊ केला आहे. एनडीएने या मतदारसंघात झामुमोला हद्दपार करण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, अन्नपूर्णा देवी, माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी व रघुबर दास यांच्या सभा या ठिकाणी झाल्या.

एमआयएम पक्षाने २०१९ साली अब्दुल रिझवी यांना निवडणुकीत उतरवले होते. यावेळी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, ३० ऑगस्ट रोजी असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.

डुमरी मतदारसंघात महतो समाजाचे प्राबल्य आहे. महतो यांच्यानंतर वैश्य आणि मुस्लीम समाजाची मोठी मतपेटी आहे. त्यानंतर आदिवासी जमातींचा क्रमांक लागतो. डुमरीमध्ये झामुमोचा पराभव झाला तरी त्याचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. ८० जागांपैकी झामुमो आघाडीकडे ४९ जागांची ताकद आहे. त्यापैकी झामुमोकडे- २९, काँग्रेस- १७, राष्ट्रीय जनता दल- एक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- एक एवढे संख्याबळ आहे. तसेच भाजपाकडे २६,
एजेएसयूकडे तीन आमदारांची ताकद आहे. डुमरी मतदारसंघात २.७३ लाख मतदार आहेत.

हे वाचा >> ‘इंडिया’ आघाडीमुळे घाबरलेल्या मोदींची घाईघाईत ३८ पक्षांची बैठक – पृथ्वीराज चव्हाण

पुथुपल्ली, केरळ

काँग्रेसचे सर्वांत ज्येष्ठ नेते, केरळचे माजी मुख्यमंत्री व १९७० पासून पुथुपल्लीचे लोकप्रतिनिधी असलेले ओमान चांडी यांच्या मृत्यूपश्चात या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. १९६७ चा अपवाद वगळता ही जागा आतापर्यंत काँग्रेसकडेच होती. २०२१ साली ओमान चांडी सलग १२ व्या वेळा या मतदारसंघातून विजयी झाले होते. सीपीआय (एम) च्या जैक सी. थॉमस यांचा त्यांनी नऊ हजार मतांनी पराभव केला होता.

केरळमध्ये काँग्रेस विरोधात असून त्यांनी ‘युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’ (UDF) नावाची आघाडी तयार केलेली आहे. या आघाडीच्या माध्यमातून चांडी यांचे सुपुत्र व युवक काँग्रेसचे नेते ३७ वर्षीय चांडी ओमान (Chandy Oommen) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ओमान चांडी यांची या मतदारसंघात बरीच लोकप्रियता आहे. जुलै महिन्यात चांडी यांचे निधन झाले. मात्र, अजूनही त्यांच्यावर प्रेम करणाले लोक समाधीजवळ येऊन मेणबत्ती लावून त्यांचे स्मरण करतात. चांडी हे मतदारसंघात कुंजुंजू (Kunjoonju) (मल्याळम भाषेत लहान मुलगा) या नावाने ओळखळे जायचे. त्यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा घेऊन चांडी यांचा मुलगा चांडी ओमान यांना विजयी करण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे.

लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) या नावाने तयार केलेल्या आघाडीच्या माध्यमातून सीपीआय (एम) पक्ष केरळच्या सत्तेत आहे. त्यांनी जैक थॉमस यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. थॉमस हे तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवीत आहेत. भाजपाकडून कोट्टयाम जिल्ह्याचे अध्यक्ष लिगिन लाल निवडणूक लढवीत आहेत. आम आदमी पक्षानेही या निवडणुकीत उडी घेतली असून, त्यांच्याकडून लूक थॉमस रिंगणात उतरले आहेत.

केरळच्या विधानसभेत १४० सदस्य असून, सत्ताधारी एलडीएफ आघाडीकडे ९८ आमदारांचे पाठबळ आहे; तर प्रमुख विरोधी आघाडी यूडीएफकडे ४० आमदार आहेत. पुथुपल्ली मतदारसंघात १.७६ लाख मतदार आहेत.

हे वाचा >> ‘इंडिया’ आघाडीच्या बिकट वाटेची माध्यमांत चर्चा

धनपूर, बोक्सानगर, त्रिपुरा

त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणूक होऊन एक महिना उलटताच या दोन मतदारसंघांत पोटनिवडणुकीची घोषणा करावी लागली. त्यापैकी एका जागेवर आमदाराचे निधन आणि दुसऱ्या जागेवरील आमदाराने राजीनामा दिल्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. दोन्ही जागांवर सीपीआय (एम) आणि भाजपाचा थेट सामना होणार आहे. काँग्रेसने सीपीआय (एम)ला आपला पाठिंबा देऊ केला आहे. तर त्रिपुराचे राजकुमार प्रद्योत बिक्रम माणिक्य देवबर्मा यांच्या टिपरा मोथा या पक्षाने आपले उमेदवार निवडणुकीत उतरवलेले नाहीत, तसेच भाजपा किंवा सीपीआय (एम) यांच्यापैकी कुणालाही पाठिंबा दर्शवलेला नाही.

धनपूर विधानसभेत भाजपाच्या प्रतिमा भौमिक यांनी आपली लोकसभा खासदारकी शाबूत ठेवण्यासाठी विधानसभेचा राजीनामा दिला. त्या सध्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या राज्यमंत्री आहेत. केंद्रात मंत्रीपद मिळवलेल्या त्या त्रिपुरातील पहिल्याच आणि ईशान्य भारतातील दुसऱ्या महिला आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भौमिक यांनी ३,५०० मतांनी सीपीआय (एम)चे कौशिक चंदा यांचा पराभव केला होता. सीपीआय (एम)ने १९७२ पासून ही जागा आपल्या ताब्यात ठेवली होती. १९९८ ते २००३ दरम्यान त्रिुपराचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या माणिक सरकार यांचा २०१८ साली या मतदारसंघात पराभव झाला. २०२३ साली सरकार यांनी निवडणूक न लढविता इतरांना लढण्याची संधी दिली.

पोटनिवडणुकीसाठी भाजपाने भौमिक यांचे बंधू बिंदू देबनाथ यांना उमेदवारी दिली आहे. भौमिक यांच्या कौटुंबिक नात्यामुळे देबनाथ यांना विजय मिळेल, असे भाजपाला वाटते; तर सीपीआय (एम) पक्षाने कौशिक चंदा यांना तिकीट दिले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. योगायोगाने देबनाथ आणि चंदा हे एकमेकांचे वर्गमित्र आहेत. धनपूर मतदारसंघात अनुसूचित जाती आणि जमातीच्या मतदारांसह अल्पसंख्याक समाजाचीही मते आहेत.

त्रिपुरातील दुसरा मतदारसंघ आहे बोक्सानगर. सीपीआय (एम)चे आमदार समसूल हक यांचे निधन झाल्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. बोक्सानगर कम्युनिस्टांचा बालेकिल्ला समजला जातो. २००३ पासून सीपीआय (एम) या ठिकाणी सलग विजय मिळवीत आहे. त्याआधी वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला तीन वेळा या ठिकाणी विजय मिळाला होता. हक यांनी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तफज्जल हुसैन यांचा पाच हजारहून थोड्या फरकाने पराभव केला होता.

हे वाचा >> इंडिया आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? शरद पवारांनी सांगितली रणनीती!

सीपीआय (एम)ने अल्पसंख्याक समाजाची ताकद असलेल्या या मतदारसंघात हक यांचे सुपुत्र मिझान हुसैन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याकडे काँग्रेसच्या युवक संघटनेची जबाबदारी होती. भाजपाने मात्र तफज्जल हुसैन यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. जर त्यांचा विजय झाला, तर राज्यातील ते भाजपाचे एकमेव मुस्लीम आमदार म्हणून ओळखले जातील.

भाजपाने २०१८ साली मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांच्या नेतृत्वाखाली २५ वर्षांची तफज्जल सीपीआय (एम)ची सत्ता उलथवून लावत सत्ता मिळवली होती. २०२३ मध्ये भाजपाने अतिशय निसटता विजय मिळवून मानिक साहा यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. ६० सदस्यांच्या त्रिपुरा विधानसभेत एनडीए युतीकडे ३२ जागा आहेत; तर टिपरा मोथा पक्षाचे १३ आमदार आहेत. सीपीआय (एम) कडे १०; तर काँग्रेसचे तीन आमदार आहेत.

बागेश्वर, उत्तराखंड

उत्तराखंडमध्ये २०२२ साली विधानसभेची निवडणूक झाली. त्यानंतर वर्षभरातच बागेश्वरमधील भाजपा आमदार चंदन राम दास यांचा मृत्यू झाल्यामुळे येथे पोटनिवडणूक लागली आहे. २०२२ साली चौथ्यांदा विजय मिळवून चंदन राम दास हे राज्यात समाजकल्याण, अल्पसंख्याक विकास, रस्ते विकास व एएसएमई मंत्री झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या रंजित दास यांचा १२ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.

यावेळी भाजपाने दास यांच्या पत्नी पार्वती यांना काँग्रेसच्या वसंत कुमार यांच्याविरोधात उभे केले आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधी काँग्रेसचे माजी उमेदवार रंजित दास यांनीच भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसने आपचे माजी उमेदवार वसंत कुमार यांना पक्षात घेऊन तिकीट दिले. रंजित यांनी भाजपामध्ये प्रवेश करूनही त्यांना तिकीट देण्यात आले नाही.

उत्तराखंड विधानसभेच्या ७० जागांपैकी भाजपाकडे ४६ आमदारांचे पाठबळ आहे. त्यानंतर काँग्रेसकडे १९ व बसपाकडे दोन आमदार आहेत. उत्तराखंडच्या कुमाऊ प्रांतातील बागेश्वर ही अनुसूचित जातींसाठी राखीव असलेली जागा आहे. २००७ पासून भाजपा सलग जिंकत आहे. २००२ साली काँग्रेसने येथे विजय मिळवला होता. मतदारसंघातील मतदारांची संख्या १.२ लाख एवढी आहे.

घोसी, उत्तर प्रदेश

आयाराम-गयाराम म्हणून प्रसिद्ध असलेल्या दारा सिंह चौहान यांनी समाजवादी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला होता. २०२२ साली चौहान यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. त्यांनी भाजपाच्या विजय कुमार राजभर यांचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. चौहान हे ओबीसी नेते असून, त्यांनी आतापर्यंत एकदा काँग्रेसचे आमदार आणि बहुजन समाज पक्षाचे खासदार म्हणून काम केले आहे. तर, दोनदा वेगवेगळ्या टर्ममध्ये भाजपा आणि समाजवादीतही काही काळ व्यतीत केलेला आहे. २०१७ ते २०२२ या काळात ते योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात होते.

घोसी मतदारसंघात १९९० पासून भाजपा, बसपा व सपा एकामागोमाग विजय मिळवीत असताना काँग्रेसला मात्र १९८९ पासून एकदाही विजय मिळवता आलेला नाही. भाजपाने पुन्हा एकदा चौहान यांना पक्षात घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्यास सांगितले आहे; जेणेकरून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल. यावेळी चौहान यांच्याविरोधात समाजवादी पक्षाकडून सुधाकर सिंह हे राजपूत समाजाचे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. राजपूत २०१२ ते २०१७ दरम्यान घोसीचे आमदार होते. मात्र २०१७ साली त्यांना पराभव सहन करावा लागला. काँग्रेसने इंडिया आघाडीमुळे समाजवादी पक्षाला पाठिंबा देण्यासाठी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला नाही. मात्र, त्याच वेळी समाजवादी पक्षाने मात्र उत्तराखंडमधील बागेश्वर मतदारसंघात काँग्रेसविरोधात उमेदवार दिला आहे. बसपाही पोटनिवडणुकीत उतरलेला नाही.

आणखी वाचा >> INDIA Meeting in Mumbai :‘शक्य तितके’ एकत्र लढणार! ‘इंडिया’ आघाडीचा ठराव; जागावाटपावर ममता बॅनर्जी आक्रमक

घोसी मतदारसंघात ओबीसी मतदानाची टक्केवारी जास्त आहे. ४.४ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात ६० हजार राजभर, ५० हजार चौहान, ४० हजार यादव व ६० हजार दलित मतदार आहेत. ९० हजार मुस्लीम आणि ७७ हजार सवर्ण जातीचे मतदार; ज्यामध्ये ४५ हजार भूमीहार, १६ हजार राजपूत व सहा हजार ब्राह्मण मतदार आहेत. मागच्या सहापैकी पाच निवडणुकांत घोसीतून ओबीसी उमेदवार विजयी होत आहे.

धूपगुडी, पश्चिम बंगाल

२०२१ साली भाजपाने पश्चिम बंगालच्या विधानसभेत जोरदार कामगिरी करीत ६९ जागांवर विजय मिळवला. मागच्या तीन निवडणुकांतील हा सर्वांत मोठा विजय आहे. धूपगुडी मतदारसंघात भाजपाचे विष्णू पद राय यांनी तृणमूल काँग्रेसच्या मिताली रॉय यांचा ४,३०० मतांनी पराभव केला होता. जुलै महिन्यात राय यांचे निधन झाल्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक घोषित झाली आहे.

भाजपाने यावेळी शहीद सीआरपीएफ जवानाच्या विधवा पत्नी तापसी रॉय यांना उमेदवारी दिली आहे. तृणमूल आणि भाजपाने नवीन उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. तृणमूलकडून निर्मल चंद्रा रॉय यांना तर सीपीआय (एम)ने ईश्वर चंद्रा रॉय यांना उमेदवारी दिली आहे.

सीपीआय (एम), तृणमूल काँग्रेस व काँग्रेस हे इंडिया आघाडीत एकत्र असले तरी या मतदारसंघात काँग्रेसने सीपीआय (एम)च्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेसने या ठिकाणी तीन वेळा; तर सीपीआय (एम)ने आठ वेळा या ठिकाणी विजय मिळविला होता. जलपाईगुडी जिल्ह्यात हा मतदारसंघ असून, अनेक ठिकाणी चहाची लागवड केली जाते. मतदारसंघाची लोकसंख्या २.६ लाख असून, राजवंशी व मतुआ जातीचे या ठिकाणी चांगले प्राबल्य दिसते.

२९४ सदस्य असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत तृणमूल काँग्रेसकडे २२०; तर भाजपाकडे ६९ जागा आहेत.