लडाखमधील तुरतुक सेक्टरमध्ये भारतीय सैन्याची गाडी दरीत कोसळ्यामुळे ७ जवानांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर अन्य जवान जखमी झाले आहेत. या गाडीत एकूण २६ जवान प्रवास करत होते. जखमी जवानांना सर्वोत्तम उपचार मिळावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सैन्यांच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९ वाजता जवानांचा हा ट्रक परतपूर येथील ट्रांजित कॅम्पवरुन हानिफ सेक्टरकडे जात होता. जेव्हा हा ट्रक थोईसपासून २५ किलोमीटर दूर आला तेव्हा ट्रकचालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि ट्रक ५० ते ६० फूट खोल श्योक नदीत पडला. या अपघातात ७ जवानांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.