आगामी २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे मंगळवारी ७ नव्या राजकीय पक्षांची नोंदणी झाली.


भारतीय विकास दल, लोकतांत्रिक जनस्वराज पार्टी, नॅशनल अवामी युनायटेड पार्टी, पुर्वांचल नवनिर्माण पार्टी, राष्ट्रीय जनशक्ती समाज पार्टी, सकळ जनुला पार्टी आणि स्वतंत्रता पार्टी या नव्याने नोंदणी झालेल्या पक्षांची नावे आहेत.

याच वर्षांत एप्रिल ते मे दरम्यान लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार सध्या देशभरात २००० नोंदणीकृत राजकीय पक्ष असून यांपैकी काही मोजक्याच पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आहे. या मान्यता असलेल्या एकूण पक्षांपैकी ७ राष्ट्रीय पक्ष आहेत. तर, ५९ पक्ष राज्य पातळीवर काम करीत आहेत.

Story img Loader