देशभरात आज गणपती बाप्पांचे विसर्जन केले जात आहे. विसर्जनादरम्यान हरियाणामध्ये मोठी दूर्घटना घडल्याचे समोर आले आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन करताना सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हरियाणा पोलिसांनी दिली आहे. सोनिपतमध्ये तिघांचा तर महेंद्रगडमध्ये चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

VIDEO पुढच्या वर्षी लवकर या…! २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर ‘लालबागचा राजा’चं विसर्जन

सोनिपतच्या मीमरघाटावर शुक्रवारी एका भाविकाकडून गणेशमूर्तीचे विसर्जन केले जात होते. यादरम्यान झालेल्या दुर्घटनेत या व्यक्तीसह त्याचा मुलगा आणि पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या तिघांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. तर दुसरी घटना महेंद्रगडमधील कानिना-रेवारी रस्त्यावर घडली आहे. या परिसरातील एका कालव्यावर नऊ जण गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी गेले होते. यादरम्यान अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यात हे सर्व जण वाहून गेले. अथक प्रयत्नानंतर एनडीआरएफच्या बचाव पथकाने आठ जणांना या कालव्यातून बाहेर काढले. तोपर्यंत यातील चार जणांचा मृत्यू झाला होता. अन्य चार जणांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Video : गणेशोत्सव मिरवणुकीत भाजपाचेच दोन गट आपापसांत भिडले; अखेर पोलिसांना करावी लागली मध्यस्थी!

या घटनेवर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दु:ख व्यक्त केले आहे. “या कठिण काळात आम्ही मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. एनडीआरएफच्या पथकाकडून या दुर्घटनेत बचावकार्य राबवण्यात आले. या घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी मी प्रार्थना करतो”, असे ट्वीट खट्टर यांनी केले आहे.

Story img Loader