बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये सात पोलीस शहीद झाले आहेत.
पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, आज(मंगळवार) दुपारी चार वाजता पोलीस उपनिरीक्षक अजय कुमार यांच्यासह इतर पाच पोलीस गस्तीसाठी आपल्या पोलीस गाडीतून बाहेर पडले असताना माओवाद्यांनी रस्त्यामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला यात एकूण सहा पोलीस आणि चालक यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळावर पोलिसांनी ताबा घेतला असून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

Story img Loader