कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना विचारलेले सात प्रश्न…
१. ललित मोदी प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि इंग्लंडमधील अधिकाऱयांमध्ये झालेला पत्रव्यवहार केंद्र सरकारकडून उघड का केला जात नाही?
२. ललित मोदी भारतीय नागरिक असल्यामुळे त्यांना पोर्तुगालला जायचे असेल, तर त्यांनी इंग्लंडमधील भारतीय दूतावासाकडे जाऊन तेथून रितसर परवानगी घ्यावी, अशी सूचना का करण्यात आली नाही?
३. ललित मोदींनी भारतात परतावे, या अटींवर त्यांना पोर्तुगालला जाण्याची परवानगी द्यावी, अशी अट का घालण्यात आली नाही?
४. ललित मोदी यांच्या पासपोर्टसंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात परराष्ट्र मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात याचिका का केली नाही?
५. ललित मोदी यांच्यासंदर्भातील फायलींवर परराष्ट्र मंत्रालयात काय टिप्पणी करण्यात आली आहे, याची माहिती उघड का करण्यात येत नाही?
६. सक्तवसुली संचालनालयाने ललित मोदींवर गुन्हे दाखल केलेले असताना इंग्लंडने ललित मोदींना ‘रेसिडन्सी परमिट’ दिले आहे. त्याला परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप का घेतला नाही?
७. भारतात परतल्यावर आपल्या जिवाला धोका आहे, असे ललित मोदी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार ललित मोदींना भारतात सुरक्षा देऊ शकत नाही का?
मल्लिकार्जुन खर्गेंनी सुषमा स्वराज यांना विचारलेले सात प्रश्न
कॉंग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना विचारलेले सात प्रश्न...
First published on: 12-08-2015 at 02:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven question by mallikarjun kharge to sushma swaraj