नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या सुकमा जिल्ह्य़ात पोलीस व नक्षली यांच्यात शनिवारी झालेल्या चकमकीत सात पोलीस शहीद झाले तर दहा जण जखमी झाले. जखमींना जगदालपूर येथील शासकीय रुग्णालयांत हलवण्यात आले आहे. dv07सुकमा जिल्ह्य़ात पिडमेल-पोलमपल्ली या भागात नक्षलवाद्यांचे अधिक प्राबल्य आहे. या भागात गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या तुकडीवर जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात सात पोलीस शहीद झाले तर दहा जण जखमी झाले. पोलिसांच्या तुकडीनेही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. चकमकीचे वृत्त समजताच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. चकमकीनंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस संचालक (नक्षलवादविरोधी पथक) आर. के. विज यांनी सांगितले. शहीद झालेल्या पोलिसांमध्ये प्लॅटून कमांडर शंकर राव, हेड कॉन्स्टेबल रोहित सोधी, मनोज बाघेल, कॉन्स्टेबल मोहन व्ही. के., राजकुमार मरकाम, किरण देशमुख व राजमान टेकम यांचा समावेश आहे.dv08

Story img Loader