मध्य प्रदेशच्या हरदामध्ये मंगळवारी रात्री दोन एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना झालेल्या अपघातातील काही मृतदेह घटनास्थळापासून तब्बल अर्ध्या किलोमीटर अंतरावर मिळाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईहून वाराणसीकडे जाणारी ‘कामायनी एक्सप्रेस’ आणि राजेंद्र नगरहून मुंबईकडे येणारी ‘जनता एक्सप्रेस’ या दोन्ही एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना मध्य प्रदेशच्या हरदा येथे कुडवा रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या माचक नदीच्या पूलाजवळ अपघात झाला होता. यावेळी ‘कामायनी एक्सप्रेस’चे मागील सहा डबे तर ‘जनता एक्सप्रेस’चे पहीले तीन डबे रेल्वे रुळावरून घसरुन नदीत कोसळले होते. तेव्हा या डब्यांमधील अनेक प्रवासी नदीत वाहून गेल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे घटनास्थळापासून अर्ध्या किलोमीटवर मिळालेले हे मृतदेह याच प्रवाशांचे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, हे मृतदेह प्रवाशांचे आहेत किंवा पुरात वाहून गेलेल्या स्थानिकांचे आहेत, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सध्या रेल्वे प्रशासन या मृतदेहांची ओळख पटविण्याच्या कामात व्यग्र असून हे मृतदेह ट्रेनमधील प्रवाशांचेच असल्यास त्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यात येईल. दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू लवकरच घटनास्थळाला भेट देणार आहेत. या अपघातात आत्तापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला असून दोनशेहून अधिक जण जखमी आहेत.
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत रेल्वे मंत्रालयाने जाहीर केली आहे, तर गंभीर जखमींना ५० हजार आणि किरकोळ जखमींना २५ हजार रुपये दिले जाणार आहेत. घडलेल्या अपघाताच्या चौकशीचे आदेश देखील रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, या अपघातामुळे मुंबई-इटारसी रेल्वे मार्गावरील गाड्यांवर परिणाम झाला असून चार गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर इतर गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
रेल्वे अपघातातील मृतदेह घटनास्थळापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर…
मुंबईहून वाराणसीकडे जाणारी कामायनी एक्सप्रेस, तर राजेंद्र नगरहून मुंबईकडे येणारी 'जनता एक्सप्रेस' या दोन्ही वेगवेगळ्या दिशेने जात असणाऱया एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना मध्यप्रदेशच्या हरदा येथे कुडवा रेल्वेस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या माचक नदीच्या पूलाजवळ अपघात झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-08-2015 at 07:29 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Several feared dead as two trains derail in madhya pradesh rescue operations on