अमेरिकेत एका सरकारी चॅट प्लॅटफॉर्मवर लैंगिकदृष्ट्या संभाषण केल्याबद्दल अनेक गुप्तचर एजन्सींमधील जवळपास १०० हून अधिक गुप्तचर अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आल्याचं राष्ट्रीय गुप्तचर संस्थेच्या (DNI) संचालक तुलसी गॅबार्ड यांनी मंगळवारी जाहीर केलं. रुढीवादी लेखक क्रिस्टोफर रुफो यांनी हा गैररप्रकार उघड केला. यामुळे व्यावसायिकता आणि सुरक्षा धोक्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रीय सुरक्षा संस्था (NSA) इंटेलिंकचे व्यवस्थापन करते. गुप्तचर व्यावसायिकांचे वर्गीकृत आणि संवेदनशील सुरक्षा बाबींवर चर्चा करण्यासाठी डिझाइन केलेले हे एक अत्यंत सुरक्षित मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. मात्र, अलिकडेच गुप्तचर अधिकाऱ्यांच्या एका गटाने लैंगिकदृष्ट्या सामग्री असलेल्या संभाषणांसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला. यात लिंग संक्रमण शस्त्रक्रियांवरील चर्चाही समाविष्ट होती.

“व्यावसायिक वापरासाठी असलेल्या NSA प्लॅटफॉर्मचा वापर करून अशाप्रकारचे वर्तन करणे निर्लज्जपणाचे आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना केवळ कामावरूनच काढून टाकलं जाणार नाही तर त्यांचे सुरक्षा परवानेही रद्द केले जाणार आहेत. यामुळे त्यांना भविष्यात गुप्तचर भूमिकांमध्ये कोठेही नोकरी मिळणार नाही”, असा इशारा तुलसी गॅबार्ड यांनी दिला.

गैरप्रकार कसा उघडकीस आला?

सिटी जर्नलचे रुढीवादी लेखक क्रिस्टोफर रुफो यांनी चॅटरुममध्ये ट्रान्सक्रिप्ट प्रकाशित केल्यावर हा गैरप्रकार उघड झाला. त्यानंतर काही वेळातच गॅबार्डने ट्रान्सक्रिप्टची सत्यता तपासून सर्व गुप्तचर संस्थांना संभाषणात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचे निर्देश जारी केले.

अधिकऱ्यांना पाठवला मेमो

डीएनआयच्या प्रवक्त्या अलेक्सा हेनिंग यांनी एक्सवर म्हटलंय की, अधिकृत एनएसए प्लॅटफॉर्मवर झालेल्या अश्लील आणि लैंगिकदृष्ट्या स्पष्ट चर्चांबद्दल सर्व गुप्तचर संस्थांना मेमो पाठवण्यात आला होता.” दरम्यान, सरकारी यंत्रणेच्या गैरवापर केल्याप्रकरणी या अधिकाऱ्यांची अंतर्गत चौकशी सुरू आहे.