स्वीडनमध्ये शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे तर या देशाने पहिल्या सेक्स चॅम्पियनशिपची घोषणाही केली आहे. लवकरच गोटेन्बर्ग या शहरात ही चॅम्पियनशिप पार पडणार आहे. स्वीडिश सेक्स फेडरेशन पहिल्या युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप ८ जून २०२३ रोजी सुरू होईल, जी काही आठवडे चालेल. यामध्ये स्पर्धकांना दररोज सहा तास स्पर्धा करावी लागणार आहे. सहभागी स्पर्धकांना सामने किंवा अॅक्टिव्हिटीजसाठी अंदाजे ४५ मिनिटं ते एक तास वेळ दिला जाईल.

सेक्स चॅम्पियनशिपचे स्पर्धक १६ विषयांमध्ये स्पर्धा करतील. ज्यात सिडक्शन, ओरल सेक्स, मसाज, सर्वात सक्रिय जोडपं यासारख्या गोष्टींचा समावेश असेल. युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपच्या विजेत्यांनी निवड तीन परिक्षक आणि प्रेक्षकांचे रेटिंग एकत्र करून केली जाईल. यामध्ये परिक्षकांची मतं ३० टक्के असतील तर ७० टक्के जनतेचं रेटिंग असेल. या एकत्रित निर्णयाच्या आधारावर विजेते निवडले जातील.

सेक्सला खेळ म्हणून मान्यता दिल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्याला चालना मिळेल, असं मत स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष ड्रॅगन ब्रॅटिच यांनी म्हटलंय.

Story img Loader