जेडीएसचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या सेक्स स्कँडल प्रकरणामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सेक्स स्कँडल प्रकरण बाहेर येताच प्रज्ज्वल रेवण्णा हे देश सोडून फरार झाल्याची माहिती आहे. तसेच जेडीएसचे नेते एचडी रेवण्णा यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच एचडी रेवण्णा यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. आता या अपहरण प्रकरणात एचडी रेवण्णा यांना कर्नाटक एसआयटीच्या पथकाकडून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

एचडी रेवण्णा यांच्या निवासस्थानी घरकाम करणारी महिला काही दिवसांपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्या महिलेच्या मुलाने दाखल केली होती. त्यानंतर एचडी रेवण्णा यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, सदर महिलेचाही व्हिडीओ या सेक्स स्कँडल प्रकरणात असल्याचा संशय पोलिसांना आहे. एचडी रेवण्णा यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला. त्यानंतर एसआयटीच्या पथकाकडून एचडी रेवण्णा यांना ताब्यात घेण्यात आले. या संदर्भातील माहिती एएनआयने दिली आहे.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?

हेही वाचा : “मी मदतीची याचना करत होते, पण तो…”, पीडित महिलेने वाचला प्रज्ज्वल रेवण्णांच्या अत्याचाराचा पाढा

जेडीएसचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर सेक्स स्कँडल प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांनी परदेशात पलायन केले. मात्र, खासदार प्रज्ज्वल रेवण्णा हे भारतात येताच कोणत्याही क्षणी त्यांना अटक होणार असल्याची माहिती आहे. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावरील आरोपाचा तपास करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा यांचा आणि त्यांच्यावरील आरोपासंदर्भातील काही माहितीचा शोध घेण्यासाठी एसआयटीचे पथक प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या बंगळुरू येथील घरी पोहोचले होते.

दरम्यान, एफआयआरनुसार, सदर घटना २९ एप्रिलची आहे. बेपत्ता झालेली महिला ही एचडी रेवण्णा यांच्या होलेनारसिपुरा येथे असलेल्या फार्महाऊसवर घरकाम करत होती. गेल्या सहा वर्षांपासून सदर महिला रेवण्णा यांच्या घरी काम करत होती, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

ब्लू कॉर्नर नोटीस काढली जाणार?

सेक्स स्कँडल प्रकरणाचे आरोप असलेले प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप समोर आल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा हे परदेशात फरार झाल्यानंतर आता केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट झाल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस काढली जाण्याची शक्यता आहे.