गोव्यात गेल्या महिन्यामध्ये एका सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना गोवा पोलिसांनी चौकशीसाठी ताबडतोब उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान तेजपाल यांना दिल्ली उच्च न्यायालयात तातडीने अटकपूर्व जामीन मिळवण्यात अपयश आले आहे. गोवा पोलिसांनी त्यांना गुरुवारी दुपारी तीनपर्यंत चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. पोलीस उपमहानिरीक्षक ओ. पी. मिश्रा यांनी याबाबत माहिती उघड करण्यास नकार दिला असला तरी तेजपाल चौकशी अधिकाऱ्यांपुढे उपस्थित राहिले नाहीत तर पोलीस त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढू शकतात. किंवा दिल्ली उच्च न्यायालयाचे अटकपूर्व जामिनाबाबतचे आदेश शुक्रवारी येईपर्यंत जाबजबाब लांबवण्याचे धोरणही पोलीस ठेवू शकतात. मिश्रा यांनी सांगितले की, चौकशी अधिकाऱ्यांनी तेजपाल यांना उद्या दुपारी तीनपर्यंत हजर होण्याचे समन्स बजावले आहे. दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने तेजपाल यांच्या २९ नोव्हेंबरच्या अटकपूर्व जामीनअर्जावर निकाल राखून ठेवला आहे. दरम्यान सदर प्रकरणातील पीडित तरुणी बुधवारी गोव्यात उपस्थित झाली व स्थानिक न्यायालयात गुन्हेगारी दंडसंहिता कलम १६४ अन्वये तिने जबानी दिली.
रम्यान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी भाजप सरकार तेजपाल यांच्यावरील प्रकरणाचा सुडाने पाठपुरावा करीत असल्याचा आरोप फेटाळला आहे.
तहलकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने भाजपचे तत्कालीन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांना पद सोडावे लागले होते. पीडित महिलेला न्याय मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले. गोवा पोलिसांवर चौकशीसाठी दडपण येत असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले.
तेजपाल यांना गोवा पोलिसांचे समन्स
गोव्यात गेल्या महिन्यामध्ये एका सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना गोवा पोलिसांनी चौकशीसाठी ताबडतोब उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-11-2013 at 01:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual assault case goa police issue summons to tarun tejpal