सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश स्वतंत्र कुमार यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी करण्यात येणाऱया वार्तांकनावर शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने काही बंधने घातली. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि वृत्तसंकेतस्थळे यांच्यावर ही बंधने घालण्यात आली आहेत. या संदर्भात बातमी असल्यास स्वतंत्रकुमार यांच्यावर केवळ आरोप करण्यात आले आहेत, याचा उल्लेख बातमीच्या शीर्षकामध्ये करण्याचे बंधन न्यायालयाने घातले. बातमी प्रसिद्ध केल्यास त्यामध्ये स्वतंत्रकुमार यांचे छायाचित्रही प्रसिद्ध करू नये, असा आदेशही न्यायालयाने दिला.
लैंगिक छळाचा आरोप झाल्यानंतर स्वतंत्रकुमार यांनी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. या घटनेचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना रोखावे, अशी मागणी करणारी याचिका स्वतंत्रकुमार यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. याप्रकरणी पुढील सुनावणी २४ फेब्रुवारी रोजी होणार असून, तोपर्यंत आदेश कायम राहतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा