केरळच्या कोझिकोड येथील जिल्हा सत्र न्यायालयाने लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिविक चंद्रन यांना लैंगिक छळाच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करताना एक निरीक्षण नोंदवले आहे. महिलेने उत्तेजक कपडे घातलेले असल्यास लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. सिविक चंद्रन यांनी जामीन अर्जासह तक्रारदार महिलेचे फोटोही न्यायालयासमोर सादर केले होते. यावेळी न्यालायालने हे निरीक्षण नोंदवले.

हेही वाचा – राजकीय पक्षांना आश्वासन देण्यापासून रोखू शखत नाही, मोफत धोरणावर सुप्रीम कोर्टाने मांडली भूमिका

चंद्रन यांनी सादर केलेल्या छायाचित्रांवरून असे दिसून येते की, महिलेने उत्तेजक कपडे घातले होते. त्यामुळे प्राथमिकदृष्ट्या भादंविच्या कलम ३५४ (अ) गुन्हा दाखल करता येणार नाही. भादंविच्या कलम ३५४ (अ) नुसार गुन्हा दाखल करायचा असेल तर महिलेचा विनयभंग करण्याची आरोपचा स्पष्ट उद्देश असायला हवा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा – “एकीकडे वेदना होत असताना दुसरीकडे मात्र…” शरद पोंक्षे यांनी शेअर केली खास पोस्ट

दरम्यान, तक्रारदार महिला ही लेखिका असून तिने लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते सिविक चंद्रन यांच्यावर लैंगिक छळ केल्या आरोप केला होता. फेब्रुवारी २०२० मध्ये नंदी बीचवर आयोजित एका शिबिरात चंद्रन यांनी आपला विनयभंग केला, असे महिलेने तक्रारीत म्हटले होते. महिलेच्या तक्रारीनंतर कोयलंडी पोलिसांनी आरोपीविरोधात भादंविच्या कलम ३५४ (अ) अंतर्गत चंद्रन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

Story img Loader