Sexual Harassment in Telugu Film Industry: गेल्या काही दिवसांपासून केरळमधील चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे. काही वर्षांपूर्वी बॉलिवुडमध्ये MeToo आंदोलनामुळे अनेक बड्या प्रस्थांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. अनेक कलाकारांनी समोर येत आपल्या व्यथा मांडल्या होत्या. गेल्या दोन आठवड्यांत मल्याळम चित्रपटसृष्टीमध्येही अशाच प्रकारे अनेक नवोदित कलाकारांपासून अनुभवी कलाकारांपर्यंत महिलांनी गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण चर्चेत असतानाच आता तेलुगू चित्रपटसृष्टीमध्येही महिला कलाकारांना कास्टिंग काऊचचे भीषण अनुभव आल्याचा प्रकार समोर येऊ लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यासंदर्भात समितीनं सादर केलेला अहवाल तत्कालीन राज्य सरकारनं चक्क बासनात गुंडाळून ठेवला आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, जून २०२२ मध्ये यासंदर्भातला एक सविस्तर अहवाल संबंधित समितीनं तत्कालीन के. चंद्रशेखर राव सरकारला सादर केला होता. पण अहवालात कारवाई करण्यासारखं फारसं काही नाही, असं म्हणत सरकारनं हा अहवालच बाजूला ठेवून दिला. आता हा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

man raped minor girl under railway bridge in nagpur
धक्कादायक! रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर करायचा लैंगिक अत्याचार…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
who is sanjay verma
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले संजय वर्मा कोण आहेत? जाणून घ्या…
Gujarat diamond factory manager dies during rape bid of 14-yr-old girl
Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करताना ४१ वर्षीय माणसाचा मुंबईत मृत्यू, पीडितेला करत होता ब्लॅकमेल
I have Been Framed Said Sanjay Roy
Kolkata Rape and Murder : “मला अडकवलं जातं आहे, कारण..” ; आर.जी. कर बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी संजय रॉय काय म्हणाला?
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
Vivek Phansalkar has additional charge of the post of Director General
मुंबई : विवेक फणसळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार
hindu temple attacked in canada (1)
Video: “कॅनडात हिंदूंवर झालेला हा हल्ला म्हणजे…”, अमेरिकन संसदेतील मराठमोळे सदस्य श्री ठाणेदार यांचं परखड भाष्य!

काय आहे या अहवालात?

तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये महिलांकडून, विशेषत: ज्युनिअर आर्टिस्ट्सकडून कामाच्या संधीच्या मोबदल्यात लैंगिक सुखाची मागणी केली जाते, त्यांचं शोषण केलं जातं, असा निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आल्याचं या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. समितीनं तेलुगू इंडस्ट्रीतील अनेक महिला कर्मचारी, ज्युनिअर आर्टिस्ट्स व कलाकारांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून गंभीर बाबी समोर आल्या. महिलांना पगार किंवा त्यांच्या मानधनासाठी छळाचा सामना करावा लागतो. त्यांच्या कामाचे लेखी काँट्रॅक्ट्स नसणे, वेतन समान नसणे, कामाच्या ठिकाणची वाईट अवस्था, स्वतंत्र स्वच्छतागृह नसणे अशा अनेक तक्रारी समोर आल्या.

Mohanlal on MeToo: मॉलीवूड लैंगिक शोषण प्रकरण: अभिनेते मोहनलाल यांचं मोठं विधान; “अनेक लोक यात..”

“अहवालातील तरतुदी सांगणं सरकारचं काम”

दरम्यान, अहवालाबाबत समितीमधील एक वरीष्ठ सदस्या कोंडाविती सत्यवती यांनी भाष्य केलं आहे. “तेलुगू चित्रपटसृष्टीत महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत अहवालात सविस्तर मुद्दे मांडण्यात आले आहेत. इथे महिलांचं मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण केलं जातं. आम्ही जवळपास २४ प्रकारची कामं करणाऱ्या महिलांशी बोललो. अगदी ज्युनिअर आर्टिस्ट्सपासून ते सपोर्ट स्टाफपर्यंत. आमचे निष्कर्ष आम्ही अहवालात मांडले आहेत. आम्ही त्याबाबत भाष्य करू शकत नाही. हे सरकारचं काम आहे”, असं सत्यवती म्हणाल्या.

७ एप्रिल २०१८ ची ‘ती’ घटना…

दरम्यान, या सगळ्या प्रकाराला वाचा फुटली जवळपास सहा वर्षांपूर्वी. ७ एप्रिल २०१८ रोजी अभिनेत्री श्री रेड्डी यांनी हैदराबादमधील तेलुगू फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयाबाहेर अर्धनग्न होऊन निषेध नोंदवला. ही बाब प्रचंड प्रमाणात चर्चेत आली. काही सामाजिक संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणाची चौकशी करण्याची मागणी केली.

Malayalam director Ranjith quits as head of Kerala Chalachitra Academy after Bengali actress accused him of misbehaving with her in 2009
दिग्दर्शत रंजीत यांच्यावर बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्राचे आरोप

एप्रिल २०१९ मध्ये केसीआर सरकारनं या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली. यात चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पोलीस आयुक्त, महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी व तेलंगणा स्टेट फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, चित्रपट कामगार संघटना यांचे प्रतिनिधी होते. या समितीनं आणखी एक उपसमिती गठित केली. या समितीनं तेलुगू चित्रपटसृष्टीशी निगडित लोकांशी चर्चा केली. २० बैठका झाल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर समितीचं काम लांबलं. जून २०२२ मध्ये समितीनं ‘सेक्श्युअल हॅरासमेंट अँड जेंडर डिस्क्रिमिनेशन इन तेलुगू फिल्म अँड टेलिव्हिजन इंडस्ट्री’ या मथळ्यासह सविस्तर अहवाल सादर केला.

Me Too : “बलात्काराचं दृष्य १७ वेळा चित्रीत करायला लावलं, दिग्दर्शकाने त्यानंतर…”, मल्याळम अभिनेत्रीने सांगितली आपबिती

सरकारला अहवालात फारसं काही दिसलंच नाही?

मात्र, एकीकडे समितीनं अहवालात सर्व गोष्टी नमूद असल्याचं सांगितलं असलं, तरी सरकारला मात्र त्यात फारसं काही आढळलं नसल्याचं सांगण्यात आलं आहे. “उपसमितीनं बरंच काम केलं. अनेकांच्या मुलाखती घेतल्या. पण त्यांनी सादर केलेल्या अहवालातून असं काहीही निष्पन्न झालं नाही, ज्यावर सरकारला कारवाई करण्याची आवश्यकता आहे”, अशी भूमिका तत्कालीन मंत्री तलासनी श्रीनिवास यादव यांनी तेव्हा मांडली होती. आता मल्याळम चित्रपटसृष्टीतील लैंगिक शोषणाचे प्रकार उघड होत असताना तेलुगू चित्रपटसृष्टीबाबतचा हा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली जात आहे.

“इथे कुणालाच जबाबदारी घ्यायची नाहीये. तक्रारी घेण्यासाठी कुणीच नाहीये. विशेषत: लैंगिक शोषणाच्या तक्रारींबाबत कमालीची अनास्था आहे. काम देण्याच्या मोबदल्यात लैंगिक सुखाची मागणी केली जाते. यात सर्वाधिक शोषण ज्युनिअर आर्टिस्ट्सचं होतं”, अशा शब्दांत कोंडाविती सत्यवती यांनी संताप व्यक्त केला आहे.