थिरुवनंतपुरम : दोन प्रौढ व्यक्तींनी स्वेच्छेने ठेवलेले लैंगिक संबंध हे भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ अंतर्गत बलात्कार ठरू शकत नाहीत. अशा संबंधांसाठी त्या व्यक्तीची संमती ही फसवणुकीने किंवा असत्य तथ्यांची बतावणी करून मिळवली असेल तरच तो बलात्कार ठरतो, असे निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

न्या. बेचू कुरिअन थॉमस यांच्या पीठाने हे निरीक्षण नोंदवून आरोपी अ‍ॅड्. नवनीत एन. नाथ (२९ वर्षे) यांना जामीन मंजूर केला. त्यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. एका महिला वकिलाला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यावर विविध ठिकाणी बलात्कार केल्याचा आणि त्यानंतर दुसऱ्या महिलेशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.  न्यायालय म्हणाले की, स्वेच्छेने लैंगिक संबंध ठेवलेल्या व्यक्तींचे त्यानंतर लग्न होऊ शकले नाही तरी तो बलात्कार ठरू शकत नाही, जोवर अशा संबंधांसाठीच्या संमतीमध्ये काही खोट आढळत नाही. लैंगिक संबंधांनंतर लग्नास नकार किंवा या संबंधांची परिणती लग्नात होऊ न शकणे, हे ते संबंध बलात्काराच्या व्याख्येत आणण्यासाठी पुरेसे नाही. लग्नाचे आश्वासन दुर्हेतूने, त्याचे पालन होणार नाही हे जाणूनच दिले असेल, तरच हे संबंध बलात्कार ठरतील.असे न्यायालयाने स्पष्ट केले. लैंगिक संबंध हे महिलेच्या इच्छेविरुद्ध किंवा तिच्या संमतीशिवाय किंवा अशी संमती फसवून, असत्य तथ्ये मांडून मिळविली असेल, तर तो बलात्कार ठरतो. लग्नाचे आश्वासन देताना ते दुर्हेतूने, फसवणुकीच्या उद्देशाने किंवा त्याचे पालन होणार नाही हे जाणूनच दिले असेल, तर त्यानंतरचे लैंगिक संबंध बलात्कार ठरतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.