भाजपचे अध्यक्ष अमित शहा व इतर तीन वरिष्ठ पक्ष नेते बिहारमधील सरकारी अतिथिगृहात लिफ्टमध्ये चाळीस मिनिटे अडकले होते. या घटनेनंतर भाजप व मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रात्री साडेअकरा वाजता लिफ्ट दोन मजल्यांच्या दरम्यान अडकली. यात कटाची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोप भाजपचे नेते सी. पी. ठाकूर यांनी केला. राज्य सरकारने भाजपचे आरोप फेटाळले असून लिफ्टमध्ये जास्त लोक आल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ सचिव शिशिर सिन्हा यांनी अतिथिगृहाला नंतर भेट दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा