काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा केल्या प्रकरणी दोषी ठरवले आहे. यासीन मलिकने दोन आठवड्यांपूर्वी सर्व आरोप स्वीकारल्यानंतर या प्रकरणामध्ये आज पटियाला न्यायालयाने या प्रकरणात निकाल देताना यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मलिकवर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, इतर बेकायदेशीर कारवाया आणि काश्मीरमधील शांतता भंग केल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. मात्र या प्रकरणातील आजच्या सुनावणीच्या आधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात गरळ ओकली आहे. ट्विटरवरुन आफ्रिदीने यासिन मलिकविरोधातील हे प्रकरण बनावट असल्याचे आरोप केले आहेत. तसेच त्याने या प्रकरणामध्ये थेट संयुक्त राष्ट्रांनी दखल द्यावी अशी मागणीही केलीय.
नक्की वाचा >> काश्मीरचा उल्लेख करत भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या शाहिद आफ्रिदाला अमित मिश्राचा सणसणीत टोला; म्हणाला, “सर्व काही तुझ्या…”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा