Preity Zinta Angry on Congress Keral : भाजपाला मदत केल्याबद्दल बँकेने १८ कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. या आरोपावर अभिनेत्री प्रीती झिंटाने संताप व्यक्त केला असून याला घृणास्पद गॉसिप म्हटलं आहे. तिने एक्सवरून नाराजी व्यक्त केली असून काँग्रेसकडून ज्या १० कोटींच्या कर्जाचा उल्लेख केला गेलाय, ते कर्ज १० वर्षांपूर्वीच चुकतं करण्यात आल्याचं तिने म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केरळच्या काँग्रेसच्या अधिकृत एक्स खात्यावरून प्रीती झिंटाला लक्ष्य करण्यात आलं होतं. त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “प्रीती झिंटाने तिचे सोशल मीडिया अकाउंट भाजपला दिले आहेत आणि बँकेचे १८ कोटींचं कर्ज माफ करून घेतले. त्या बँकेवर आता निर्बंध लादण्यात आले असून बँकेचे खातेदार पैशांसाठी रस्त्यावर आले आहेत.”

प्रीती झिंटाची तिखट प्रतिक्रिया

प्रीती झिंटाने या एक्स पोस्टवर तत्काळ प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “मी माझे सोशल मीडिया अकाउंट स्वतः चालवते आणि खोट्या बातम्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल तुम्हाला लाज वाटायला हवी! कोणीही माझ्यासाठी काहीही किंवा कोणतेही कर्ज माफ केले नाही. मला धक्का बसला आहे की एक राजकीय पक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी माझ्या नावाचा आणि प्रतिमांचा वापर करून खोट्या बातम्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि वाईट गॉसिप करत आहेत. ते क्लिक बाइट्समध्ये गुंतले आहेत. रेकॉर्डसाठी कर्ज घेतले गेले होते आणि ते पूर्णपणे १० वर्षांपूर्वीच परत केले गेले होते. आशा आहे की हे स्पष्ट होईल आणि भविष्यात कोणतेही गैरसमज होणार नाहीत.”

काँग्रेसचं स्पष्टीकरण काय?

प्रीतीने प्रत्युत्तर दिल्यानंतर काँग्रेसनेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही तुमचं खातं स्वतः सांभाळत आहात हे वाचून छान वाटलं. कारण इतर सेलिब्रिटिंचे खाते आयटी सेलला देण्यात आले आहेत. स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चूक झाली असेल तर आम्ही माफी मागतो, असं म्हणत काँग्रेसने त्यांच्यावर आरोप का केले याचंही स्पष्टीकरण दिलं.

माध्यमातील वृत्तांनुसार प्रीती झिंटाचे १८ कोटी रुपयांचे कर्ज योग्य वसुली प्रक्रिया न पाळता माफ करण्यात आल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचे सहा महिन्यांसाठी ठेवी काढणे स्थगिती दिली. या गैरव्यवहारात प्रीती झिंटाचंही नाव पुढे आलं होतं. तर, या आठवड्यात, आरबीआयने बँकेच्या ठेवीदारांना २७ फेब्रुवारीपासून २५,००० रुपयांपर्यंत पैसे काढण्याची परवानगी देऊन काही दिलासा जाहीर केला. यामध्ये प्रीती