माजी कायदा मंत्री आणि आम आदमी पक्षाच्या स्थापनेला महत्वाचा हातभार लावणारे सदस्य शांती भूषण यांनी ‘मेल टूडे’ या वृत्तपत्रात अरविंद केजरीवांवर टीका करणारा कोणताही लेख लिहीला असल्याची माहिती फोल ठरवत असा कोणताही लेख मी लिहीला नसल्याचे म्हटले आहे
अरविंद केजरीवालांविरोधात कोणताही लेख मी लिहीलेला नाही. संबंधित लेख बनावटरित्या छापला गेला असेल. मी याप्रकरणी संबंधित प्रकाशन आणि माध्यमांविरुद्ध तक्रार करणार असल्याचे शांती भूषण म्हणाले आहेत.
यावर ‘मेल टूडे’चे संपादक, संदीप बामझाइ यांना विचारले असता, या प्रकरणी मी सविस्तर माहिती घेत असल्याचे म्हटले.
लेखात नेमके काय?
मेल टूडे मधील लेखात अरविंद केजरीवालांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा हुशारीने हाताळून भाजपला लक्ष्य केले. एका बाजूने भाजप आणि काँग्रेसवर टीकास्त्र करणे दुसऱयाबाजूने मुस्लिम समाजमन भाजपच्या विरोधात असल्याचे ओळखणे यातून मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी मुस्लिम नेत्यांची भेट घेणे केजरीवालांचा चांगले जमले. काँग्रेसतर मेटाकुटीस आल्याचे ध्यानात आल्याने भाजपचा सामना करण्यासाठी नव्या व्यासपीठाची इच्छा यातून समोर येते. असे म्हटले आहे.
केजरीवालांविरोधात कोणताही लेख लिहिलेला नाही- शांती भूषण
माजी कायदा मंत्री आणि आम आदमी पक्षाच्या स्थापनेला महत्वाचा हातभार लावणारे सदस्य शांती भूषण यांनी 'मेल टूडे' या वृत्तपत्रात अरविंद केजरीवांवर टीका करणारा कोणताही लेख लिहीला
First published on: 13-12-2013 at 05:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shanti bhushan denies writing article critical of arvind kejriwal