माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या तिसऱ्या आघाडीविरोधात जेटली यांनी योजनापूर्वक टिप्पणी करण्याचे टाळले. तिसरी आघाडी प्रादेशिक पक्षांची आहे. जे पक्ष यात सहभागी झाले आहेत त्यांची सत्ता असलेली राज्ये आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असल्याचे ते म्हणाले. पवार यांच्या घरी बैठकीत सहभागी झालेले प्रादेशिक पक्ष जीएसटीचे समर्थन करतात व खुद्द शरद पवार जीएसटीचे समर्थक आहेत, याकडे जेटली यांनी लक्ष वेधले. पवार यांच्या निवासस्थानी बुधवारी झालेल्या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जदयूचे शरद यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला उपस्थित होते. याखेरीज आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्यास सहमती दर्शवली आहे.
जीएसटीसाठी विशेष अधिवेशन?
कामकाजाविना पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रलंबित राहिलेल्या महत्त्वपूर्ण विधेयकांचा मार्ग मोकळा करण्यासाठी केंद्र सरकार विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या इराद्यात आहे. अद्याप यासंबंधी निर्णय झाला नसला तरी ‘जीएसटी विधेयक डिसेंबपर्यंत लांबणीवर गेल्यास निर्धारित १ एप्रिल २०१६ पासून अंमलबजावणी करता येणार नाही,’ अशी चिंता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून जीएसटी मंजूर करण्याची चाचपणी सुरू झाली आहे. संसदीय कामकाज कॅबिनेट समितीच्या बैठकीत यासंबंधी चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनात एकही दिवस कामकाज होऊ न देणाऱ्या काँग्रेसविरोधात भाजप पुन्हा प्रचार करणार आहे. काँग्रेस खासदारांच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांची सभा घेण्याची रणनीती भाजपने आखली आहे. काँग्रेस एका परिवाराला वाचविण्यासाठी देशाचे नुकसान करीत असल्याचेही ते म्हणाले.
पवार तर जीएसटी समर्थक – जेटली
माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या तिसऱ्या आघाडीविरोधात जेटली यांनी योजनापूर्वक टिप्पणी करण्याचे टाळले.
First published on: 14-08-2015 at 04:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar is gst supporters says arun jaitley