शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू आणि राष्ट्रवादीतल्या तडफदार तरुण नेत्या अशी ओळख असलेल्या सोनिया दुहान यांनी सोनिया गांधींना आमच्या लीडर होता आलं नाही असं म्हणत खंत व्यक्त केली आहे. शरद पवार हे माझं दैवत आहेत, उद्याही ते माझं दैवत असतील असंही सोनिया दुहान यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी सोनिया दुहान अजित पवारांनी बोलवलेल्या बैठकीत उपस्थित

सोमवारी सोनिया दुहान या अजित पवारांनी बोलवलेल्या बैठकीत मागच्या दाराने उपस्थित राहिल्या होत्या. त्यामुळे शरद पवारांच्या विश्वासू शिलेदार सोनिया दुहान या अजित पवार गटात प्रवेश करतील अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र मी असा कुठलाही निर्णय घेणार नाही असं सोनिया दुहान यांनी स्पष्ट केलं. तसंच शरद पवार माझे दैवत आहेत आणि राहतील. पण सुप्रिया सुळेंना लीडर होता आलं नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली.

हे पण वाचा- ‘अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार का?’, शरद पवारांच्या ‘लेडी जेम्स बाँड’चं उत्तर, “मी पक्ष..”

काय म्हणाल्या आहेत सोनिया दुहान?

“मी माझा पक्ष सोडलेला नाही. मी अजित पवारांच्या पक्षात गेलेले नाही. मला अजित पवारांच्या बैठकीत पाहिलं गेलं आणि चर्चा सुरु झाल्या. पण मी अजित पवारांसह नाही. ज्यादिवशी पक्ष फुटला त्यादिवशी सुप्रिया सुळेही अजित पवारांच्या निवासस्थानी होत्या. याचा अर्थ त्या अजित पवारांबरोबर आहेत असा नाही. त्याचप्रमाणे मीदेखील अजित पवारांसह नाही. मी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केलेला नाही. तसंच मी शरद पवारांना सोडलेलं नाही. मी अद्यापपर्यंत पक्ष सोडलेला नाही. मात्र मलाही माझं म्हणणं मांडायचं आहे.” असं म्हणत सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळे लीडर होऊ शकल्या नाहीत ही खंत व्यक्त केली.

सुप्रिया सुळे आमच्या लीडर होऊ शकल्या नाहीत

“मी मुंबईत आले आहे कारण धीरज शर्मा, मी आणि इतर असे अनेक लोक आहेत जे शरद पवारांसाठी निष्ठेने काम करत आहेत. त्यांच्यासाठी शरद पवारांचा शब्द अंतिम आहे. असे सगळेजण आज शरद पवारांचा पक्ष का सोडत आहेत? किंवा वेगळा निर्णय का घेत आहेत? आत्ता कुणाचं सरकार आलेलं नाही. आज निवडणूक नाही. कुणाला डॅमेज करण्याचा हा प्रश्न नाही. मी जबाबदारीने काम करते आहे त्यामुळे मी हे सगळ्यांच्या वतीने हे प्रश्न उपस्थित करते आहे. शरद पवार हे आमचे लीडर होते, आहेत आणि राहतील. पण सुप्रिया सुळे या कार्यकारी अध्यक्ष आहेत. त्यांच्याविषयी मनात आदर आहे. पण अत्यंत खेदाने मी हे सांगू इच्छिते की त्या आमच्या लीडर होऊ शकल्या नाहीत. सुप्रिया सुळे आमच्या लीडर होऊ शकल्या नाहीत हे वास्तव आहे. त्यांच्यामुळे आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या काही लोकांमुळे एकनिष्ठ लोक निर्णय घेत आहेत आणि पक्ष सोडत आहेत. मी आजपर्यंत पक्ष सोडलेला नाही. पण मी लवकरच पक्ष सोडण्याचा निर्णय घेईन. मी अजित पवार गटात किंवा भाजपात जाणार नाही. सुप्रिया सुळेंच्या आसपास जे लोक आहेत ते काम करणाऱ्या लोकांना संपवू पाहात आहेत, हटवू पाहात आहेत. २० ते २५ वर्षांपासून जे शरद पवारांसाठी काम करत आहेत त्यांना हटवलं जातं आहे. आम्ही अशावेळी पक्ष सोडतो आहे जेव्हा महाराष्ट्रात ३० जागा येतील असं सांगत आहेत. मात्र मला हे सगळं अत्यंत खेदाने सांगावं लागतं आहे.” असं सोनिया दुहान म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar is our leader but supriya sule is not good leader sonia doohan express her feelings scj
Show comments