शनिवारी (१३ मे) कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने १३५ जागा जिंकत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला धोबीपछाड दिला आहे. या निवडणुकीत भाजपाला केवळ ६६ जागा जिंकता आल्या. २०२४ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील पराभव हा भाजपाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाने हिंदू मतदारांना साद घालण्यासाठी विविध हिंदू मुद्द्यांवर मतं मागण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अगदी हिजाब बंदीपासून, बजरंग बली, बजरंग दल आणि मुस्लीम आरक्षण हटवणे, अशा विविध मुद्द्यांचा समावेश होता. असं असूनही या निवडणुकीत धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरणाचे मुद्दे फारसे चालले नसल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलं.

Chandrakant patil loskatta news
चावडी : चंद्रकांतदादांची ‘साखरझोप’
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
minister uday samant on Marathi language,
मराठीचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी ठेचून काढू; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा इशारा
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
Jitendra Awhad
Namdeo Shastri : “समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट”, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया चर्चेत
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
Spontaneous response to exhibition of Shiva era weapons in Karad
शिवकालीन शस्त्रे पाहताना आबालवृद्ध भारावले, कराडमधील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Santosh Juvekar
“डोळ्यात पाणी…”, ‘छावा’मधील राज्याभिषेकाच्या सीनबाबत संतोष जुवेकर म्हणाला, “विकी कौशलची एन्ट्री…”

दरम्यान, अभिनेते आणि व्याख्याते शरद पोंक्षे यांनी एक ट्वीट केलं आहे. “असं वाटं हिंदू कुंभकर्णाचे बाप आहेत. जागेच होत नाहीत,” असं शरद पोंक्षे यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. पोंक्षे यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आता काही ट्विटर वापरकर्ते प्रतिक्रिया देत आहेत. त्यांची ही प्रतिक्रिया कर्नाटक निवडणुकीशी जोडली जात आहे. यावर शिवसेनेशी संबंधित असणाऱ्या अनुज म्हात्रे नावाच्या एका ट्वीटर वापरकर्त्याने शरद पोंक्षेंना उद्देशून म्हटलं की, “अच्छा म्हणजे जनतेने काँग्रेसला निवडून दिले तर ते झोपलेले हिंदू? नशीब देशद्रोही म्हटलं नाही.”

या ट्वीटबरोबर शरद पोंक्षे यांनी अन्य एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी एका एका मुस्लीम नेत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. संबंधित मुस्लीम नेता कर्नाटकच्या मंत्रिमंडळात मुस्लीम नेत्यांना महत्त्वाची पदं द्यावीत आणि कर्नाटकचा उपमुख्यमंत्री मुस्लीम असावा, अशी मागणी मुस्लीम नेता करत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना शरद पोंक्षे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “हिंदूंनो अजूनही जागे व्हा, वेळ गेलेली नाही .काँग्रेसला निवडून दिल्याची परतफेड म्हणून काय मागतायत पाहा. जागे व्हा हिंदूंनो…”

Story img Loader