एरवी सतत विरोधी पक्षाच्या भूमिकेतून टीकारोपांचा कडवट वर्षांव करीत असलेले ज्येष्ठ संसदपटू आणि जनता दल (संयुक्त)चे अध्यक्ष शरद यादव यांच्यातील सौंदर्यासक्तीच्या प्रत्ययाने मंगळवारी अनेक पत्रकारांची दांडी गुल झाली!
शरद यादव हे मध्य प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यांशी निगडित आहेत. दोन्ही राज्यांचे त्यांनी संसदेत प्रतिनिधित्व केलेले आहे. मध्य प्रदेशात शिवराज चौहान आणि बिहारमध्ये नितीशकुमार हे मुख्यमंत्री चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांची तुलना शरदबाबूंच्या तोंडून करण्यासाठी, मंगळवारी भोपाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत एका महिला वार्ताहराने त्यांना जरासा खवचट प्रश्न विचारला, ‘‘या दोन्हीपैकी कोणते राज्य तुम्हाला अधिक सुंदर वाटते?’’ शरद यादव हे कसलेले मुत्सद्दी. ते म्हणाले, ‘‘मला सगळा देशच सुंदर वाटतो.’’ पण ते एवढय़ावरच थांबले नाहीत. पुढे हसत हसत ते त्या महिला वार्ताहराला म्हणाले, ‘‘फार कशाला? तूसुद्धा खूप सुंदर आहेस!’’ त्यांच्या त्या वाक्याने तिथे हास्याचा एकच कल्लोळ माजला. एखादा मुरब्बी राजकारणी बघता-बघता राजकीयदृष्टय़ा अवघड प्रश्न कसा उडवून लावतो, याचे प्रात्यक्षिक या निमित्ताने उपस्थित पत्रकारांना मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा