भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्यादृष्टीने काश्मीर हा महत्त्वपूर्ण मुद्दा असून त्यावर तोडगा काढायचा असल्यास तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीची गरज असल्याचे नवाज शरीफ यांनी सांगितले. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्न सोडविण्यासंदर्भात कोणतीही बोलणी सुरू नाहीत. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी एका मध्यस्थाची गरज आहे. भारताला मध्यस्थाचा पर्याय मान्य नसेल तर द्विपक्षीय संवादाचे गाडे अडून राहील, असे शरीफ यांनी म्हटले. नवाज शरीफ हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मी बराक ओबामांना या सगळ्याची कल्पना दिली आहे. परंतु, सध्या यासाठी भारताकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचे शरीफ यांनी म्हटले. भारत-पाकिस्तान यांच्यातील काश्मीर प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे, यावर ओबामाही सहमत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा