अस्वस्थ व छातीत दुखू लागल्याने शुक्रवारी मध्यरात्री एम्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेले केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना आज (शनिवार) सकाळी ‘डिस्चार्ज’ देण्यात आला.
पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर संयुक्त राष्ट्रांचे माजी अधिकारी आणि केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे आज (शनिवारी) सकाळी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री थरूर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले.  त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. पत्नीच्या निधनाने थरूर यांना धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलातील ३४५ क्रमांकाच्या खोलीत शुक्रवारी रात्री थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळून आला होता. सुनंदा यांनी आत्महत्या केली असावी असा संशय दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला आहे.  दोनच दिवसांपूर्वी त्यांनी आपले वैवाहिक जीवन धोक्यात असून, थरुर यांचे पाकिस्तानी पत्रकार प्रेमप्रकरण असल्याचे ट्विट केले होते. द इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकारांशी बोलताना सुनंदा यांनी सदर ट्विटला दुजोरा दिला होता आणि आपण लवकरच घटस्फोटाची याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले होते.

Story img Loader