नवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीचे कौतुक करताना अमेरिकेतील वृत्तनिवेदक टकर कार्लसन यांनी भारतावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यावरून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी खडे बोल सुनावले. तर समाजमाध्यमांवरही या वक्तव्यावरून टीकेची झोड उठली. ‘ब्रिटिशांनी मुंबईतील रेल्वे स्थानकासारखी इमारत बांधली. स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी भारत ब्रिटनपेक्षा कितीतरी शक्तिशाली आहे.
हेही वाचा >>> मोदींसमोर गुजरात मुख्यमंत्र्यांकडून अर्बन नक्षल असल्याचा आरोप, मेधा पाटकर यांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…
मात्र त्यांना अद्याप अशी एकही इमारत उभारता आलेली नाही,’ अशी टिप्पणी कार्लसन यांनी एका कार्यक्रमात केली. त्यावर ‘रागावर नियंत्रण न ठेवता व्यक्त होण्यासाठी एखादी सोय ट्विटरने ठेवली पाहिजे. मात्र सध्या मी यावरच समाधान मानतो,’ असे ट्विट करून त्यांनी चिडलेले लाल ‘इमोजी’ वापरले. कार्लसन यांच्या या विधानावर समाजमाध्यमांतून टीका होतेय. ‘भारतामध्ये ब्रिटिश येण्यापूर्वी बांधलेल्या अनेक उत्तुंग इमारती आहेत. ब्रिटनच्या राजवटीने त्यांना फक्त लुटले. त्यातून ते आता सावरत आहेत,’ अशी प्रतिक्रिया एका वापरकर्त्यांने दिली आहे.