Shashi Tharoor काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरुर सध्या चर्चेत आहेत. शशी थरुर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊ शकतात अशाही चर्चा रंगल्या आहेत. राजकीय मतभेद आणि कलह सुरु असल्याने शशी थरुर काँग्रेसमधून बाहेर पडतील अशी चिन्हं आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला एक मुलाखत दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले शशी थरुर?

“मी एक क्लासिक उदारमतवादी माणूस आहे. मी जातीयतेचा विरोध दर्शवणारा माणूस आहे. आर्थिक विकास झाला पाहिजे आणि समाजातल्या तळागाळातल्या न्याय मिळाला पाहिजे अशी माझी भूमिका कायमच राहिली आहे. भारतात लोकशाही पद्धत रुढ आहे आणि मी त्या लोकशाहीचा सन्मान करतो.” असं शशी थरुर यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसमधल्या कलहांबाबत काय म्हणाले थरुर?

काँग्रेस पक्षातल्या कलहांबाबत विचारलं असता शशी थरुर म्हणाले, “माझ्याच पक्षात काही लोक माझ्या विरोधात आहेत. मात्र मला भारत आणि केरळ यांच्या भविष्याबाबत बोलायला आवडतं. माझ्याच पक्षातले लोक माझ्यावर टीका करत आहेत. मात्र मी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. काँग्रेसबाबत असलेली माझी निष्ठा कायम आहे. जर पक्षाने मला मोठी जबाबदारी दिली तर ती स्वीकारण्यासही मी तयार आहे. माझ्या राजकीय भविष्याविषयी म्हणत असाल तर मी तसा फारसा विचार केलेला नाही. पण सार्वजनिक जीवनात मी समाजसेवा करण्यावर भर देईन.” असं थरुर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चा जवळपास मावळल्याची चिन्हं आहेत.

आयुष्यात बरं चाललं आहे-थरुर

मी कायमच एक क्लासिक उदारमतवादी माणूस म्हणून काम करत आलो आहे. सध्या माझं आयुष्य सुरळीत सुरु आहे. माझ्या पत्नीच्या निधनानंतर माझ्या आईने मला विवाह कर असंही सांगितलं. मात्र मी समाधानी आहे जे काही चाललं आहेते व्यवस्थित चाललं आहे असंही थररुर यांनी म्हटलं आहे.

मोदींच्या कौतुकाबाबत काय म्हणाले थरुर?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पिनराई विजयन यांच्या लेफ्ट ड्रेमोक्रॅटिक फ्रंट सरकारचे कौतुक केल्याप्रकरणी शशी थरूर म्हणाले की, मी माझी मते रोखठोकपणे मांडत आलो आहे. मग ते देशाच्या किंवा केरळच्या विकासासाठी असो. माझ्यासारख्या राजकारण्याने राजकीय विचारांच्या बाबीतत लहान विचार करून चालणार नाही. त्यामुळेच मला जे चांगले वाटते, त्याबद्दल मी मोकळ्या मनाने बोलतो, मग काँग्रेस पक्ष त्या गोष्टीच्या विरोधात का असेना.