काँग्रेसचे खासदार शशी थरुर हे अनेकदा त्यांच्या इंग्रजीबद्दलच्या प्रेमासाठी चर्चेत असतात. अनेकदा थरुर हे सोशल नेटवर्किंगवर खास करुन ट्विटरवर व्यक्त होताना इंग्रजीमधील असा काही भन्नाट शब्द वापरतात की जो अनेकांनी यापूर्वी पाहिलेला नासतो. त्यांच्या याच वेगळेपणामुळे ते नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय असतात. या शिवाय थरुर हे आणखीन एका गोष्टींसाठी चर्चेत असतात ते त्यांच्या महिला सहकारी. अनेक मिम्स पेजेसवर थरुर यांचे वेगवेगळ्या कार्यक्रमांमधील ते भेटलेल्या महिला सहकाऱ्यांसोबतचे फोटो मजेदार कॅप्शनसहीत व्हायरल होत असतानाच दिसतात. सध्या थरुर यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळेही दिसत आहेत. हा व्हिडीओ अनेक मजेशीर कॅप्शनसहीत व्हायरल झाल्यानंतर थरुर यांनी नेमकं काय घडलं होतं याबद्दल खुलासा केलाय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा