काँग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरच्या नावाची ट्विटरवर खिल्ली उडवली आहे. शनिवारीच मानुषीने ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला . मात्र शशी थरूर यांनी मानुषीच्या आडनावाची खिल्ली उडवली. छिल्लर हे आडनाव त्यांनी नोटाबंदीशी जोडले.. ‘मोदी सरकारने आमच्या काळात सुरू असलेले चलन बंद केले. ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे. आमच्या काळात असलेली चिल्लरही आता मिस वर्ल्ड झाली’ या आशयाचे ट्विट शशी थरूर यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शशी थरूर यांनी या प्रकारचे ट्विट करताच नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेचा वर्षाव केला. मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला आहे. तिची अशा प्रकारे खिल्ली उडवणे चूक आहे. तुम्हाला हे शोभत नाही असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. तर शशी थरूर यांची तुलना काही जणांनी राहुल गांधींसोबत केली आहे. राहुल गांधी आणि शशी थरूर यांनी एकमेकांचे ट्विटर अकाऊंट बदलले आहेत असेच वाटते आहे. असे ट्विट काही नेटकऱ्यांनी केले.

हरयाणाच्या मानुषी छिल्लरने शनिवारी मिस वर्ल्डचा मुकुट पटकावला. प्रियांका चोप्रानंतर १७ वर्षांनी भारताला हा बहुमान मिळाला. तिला मिळालेल्या या पुरस्कारामुळे भारतीय सौंदर्याची जगभरात पुन्हा एकदा वाहवा झाली. चीनच्या सान्या या शहरात रंगलेल्या स्पर्धेत १०८ स्पर्धकांना मागे टाकत मानुषीने ‘मिस वर्ल्ड’ या बहुमानावर नाव कोरले. सगळ्या देशाला तिच्याबद्दल अभिमान आहे अशात काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मात्र तिच्या आडनावाची तुलना थेट नोटाबंदीशी करत तिची खिल्ली उडवली आहे.