Shashi Tharoor Slams Nitesh Rane over statemen against Muslims : भाजपा नेते व मंत्री नितेश राणे हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. शुक्रवारी (१० जानेवारी) सांगलीमध्ये बोलत असताना पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. राणे म्हणाले, “हिंदू म्हणून आपली भूमिका स्पष्ट ठेवली आणि हिंदूंनी एकत्र येऊन आम्हाला मतदान केलं, म्हणून आम्ही जिंकलो. त्यामुळे आता हे (महाविकास आघाडी) लोक ईव्हीएमच्या (EVM) नावाने बोंबलत आहेत. ते लोक ईव्हीएमच्या नावाने बोंबलतायत कारण त्यांना हिंदू एकत्र आल्याचं हजम (पचन) होत नाहीये. खरंतर यांना ईव्हीएमचा अर्थच माहिती नाही. ईव्हीएम म्हणजे Every Vote Against Mullah (प्रत्येक मत हे मुल्लाहविरोधात). आम्ही या ईव्हीएममुळेच निवडून आलेलो आहोत. राणे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर विरोधकांकडून, अल्पसंख्याक समुदायाच्या नेत्यांकडून टीका होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा