“कुस्तीपटू बेशिस्त आहेत. त्यांनी अशाप्रकारे रस्त्यावर उतरणे अपेक्षित नव्हतं. यामुळे देशाची प्रतिमा मलिन होते”, असं वक्तव्य राज्यसभा खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशभरात त्यांच्यावर टीका होत आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीही त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शशी थरूर यांनी ट्वीट करून म्हटलं की, “प्रिय @PTUshaOfficial वारंवार अमानुष लैंगिक छळ होत असताना तुमच्या सहकारी खेळाडूंनी पुकारलेल्या आंदोलनांना तुम्ही कमी लेखणे अपेक्षित नाही. त्यांच्या हक्कांसाठी ते उभे राहिले असून यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत नाही. परंतु, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, त्यांना ऐकून घेण्याऐवजी त्यांचीच चौकशी करून कारवाई करणं यामुळे देशाची प्रतिमा मलिन होते.”

पी. टी. उषा काय म्हणाल्या होत्या?

“कुस्तीगिरांनी आमच्याकडे येण्याऐवजी थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन करणे हे बेशिस्त वागुणकीचे लक्षण आहे. त्यांनी देखरेख समितीचा चौकशी अहवाल समोर येण्याची वाट पाहणे गरजेचे होते. कुस्तीगिरांनी उचलेलेल पाऊल योग्य नाही. त्यांनी जे केलं आहे ते खेळासाठी आणि देशासाठी चांगलं नाही. हा निगेटीव्ह दृष्टीकोन आहे”, असं पी. टी. उषा म्हणाल्या. तसंच, “यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे,” असंही पी. टी. उषा यांनी म्हटलं.

हेही वाचा >> “हे सगळं पाहून मला वेदना होतायत”, नीरज चोप्राची भावनिक पोस्ट व्हायरल; जाहीर केला आंदोलनकर्त्या महिला कुस्तीपटूंना पाठिंबा!

खेळाडूंचाही संताप

पी.टी. उषा यांचं असं वक्तव्य आल्यानंतर अनेक खेळाडूंनीही त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. “पीटी उषा ही आमची आयकॉन आहे. तिच्या बोलण्याने आम्हाला वाईट वाटले. मला त्यांना विचारायचे आहे की जेव्हा त्यांची अकादमी उद्ध्वस्त केली जात होती आणि त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या चिंता व्यक्त केल्या होत्या, तेव्हा भारताची प्रतिमा डागाळली नाही का?,” असा सवाल ऑलिम्पियन बजरंग पुनिया यांनी उपस्थित केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashi tharoors sharp reaction to pt ushas remark on wrestlers protest sgk
Show comments