भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याभोवती असलेल्या गर्दीचा फोटो ट्विट करून थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाउडी मोदी कार्यक्रमावर टीका केली होती. मात्र, तो फोटो चुकीचा असल्याचे नंतर थरूर यांनीच स्पष्ट केले. त्यानंतर थरूर यांनी अमेरिकेतील विस्काँसीन मॅडिसन विद्य़ापीठातील नेहरूंचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोवरून नेटकऱ्यांनी थरूर यांना ट्रोल केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाउडी मोदी कार्यक्रमावरून काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी मोदींना लाभलेली गर्दी ही पब्लिसिटी, मार्केटिंग आदींचा मेळ असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगत टीका केली होती. काँग्रेसचे नेते खासदार शशी थरूर यांनीही  माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा परदेशी दौऱ्यातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. “नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे १९५४ मधील हे छायाचित्र आहे. बघा, कोणताही प्रचार न करता, अनिवासी भारतीयांच्या गर्दीचं व्यवस्थापन न करता किंवा माध्यमातून प्रचार न करता किती उत्साहाने अमेरिकन नागरिक नेहरूंच्या स्वागतासाठी आली होती,” असं थरूर म्हणाले होते. त्यानंतर हा फोटो अमेरिकेतील नसल्याचं त्यांनीच स्पष्ट केलं होतं.

“मी सांगितलेला फोटो मला पाठवण्यात (फॉरवर्ड) आला होता. तो फोटो अमेरिकेतील नसून सोव्हिएत युनियनमधील आहे. हे काही असलं तरी माझ्या मतावर ठाम आहे. देशाच्या माजी पंतप्रधानानींही परदेशात लोकप्रियतेचा अनुभव घेतला आहे. जसा सन्मान मोदींना मिळत आहे. पंतप्रधानांना मिळालेला सन्मान हा देशाबद्दलचा आदर आहे,” असं थरूर म्हणाले.

Story img Loader