पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना तृणमूल काँग्रेसने लोकसभेच्या पोटनिवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करुन १३ मार्च रोजी ही माहिती दिली. त्यानंतर आता शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश आणि यासाठी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बजावलेली भूमिका याबाबत माहिती दिलीय. माझ्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागे प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय असं त्यांनी म्हटलंय. एनडीटीव्हीने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“तृणमूल काँग्रेमध्ये सामील होणं म्हणजे मी माझं भाग्य समजतो. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला मी हवा होतो. त्यामुळे मी आसनसोल लोकसभा मतदरासंघातून निवडणूक लढवावी असं ममता बॅनर्जी यांनी ट्विट केलं. यशवंत सिन्हा आणि प्रशांत किशोर यांनी यामध्ये मोठी भूमिका बजावली,” असं शत्रुघ्न यांनी सांगितलं.

आणखी बातम्या >>> The Kashmir Files : ‘कश्मीर फाईल्स’बाबतच्या वादावर नाना पाटेकरांचं परखड मत; म्हणाले, “हिंदु आणि मुसलमान…”!

तसेच पुढे बोलताना, “प्रशांत किशोर माझ्याकडे आले होते. त्यांनी माझ्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसे मी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील व्हावं अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली,” असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

आणखी बातम्या >>> “द कश्मीर फाइल्समध्ये काहीही खोटं दाखवलेलं नाही”; चिन्मय मांडलेकरने मांडले रोखठोक मत

शत्रुघ्न सिन्हा यांनी आगामी लोकसभा निवडणूक तसेच पंतप्रधानपदासाठीच्या उमेदवारीविषयी भाष्य केलं. ममता बॅनर्जी या पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत का या प्रश्नाला उत्तर देताना, “ममता बॅनर्जी देशाच्या नेत्या म्हणून योग्य आहेत, असं मला वाटतं. ममता बॅनर्जी या खऱ्या अर्थाने जनतेच्या नेत्या असून त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे,” असं शत्रुघ्न यांनी म्हटलंय.

दरम्यान, पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीच्या प्रचाराची धुरा प्रशांत किशोर यांच्याकडे दिली होती. त्यानंतर ममता यांनी ही निवडणूक जिंकली. मात्र अजूनही प्रशांत किशोर ममता यांच्यासोबत काम करत आहेत. ममता बॅनर्जी यांना केंद्रस्थानी ठेवून विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रशांत किशोर प्रयत्नरत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shatrughan sinha said prashant kishor played crucial role in join trinamool congress prd