पंतप्रधानपदाच्या उमेदवारीविषयी पक्षातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांंनी कोणतीही टिप्पणी करू नये, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे बजावूनही आज पक्षाचे लोकसभेतील खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा मोदी यांचीच तरफदारी केली.
पंतप्रधानपदाच्या उमेदवाराविषयीचा निर्णय भाजपच्या संसदीय मंडळात घेतला जाईल, त्याविषयी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांंनी जाहीर मतप्रदर्शन टाळावे, असे आजच राजनाथ सिंह यांनी निर्देश दिले होते. पण या निर्देशांची सर्वप्रथम पायमल्ली शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी केली.
भाजपकडून पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच योग्य उमेदवार असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी सुचविले. पंतप्रधानपदासाठी यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केलेले मत योग्यच आहे, असे ते म्हणाले. मोदी यांच्या समर्थनाची भाजपमध्ये लाटच आली असून त्याची सुरुवात यशवंत सिन्हा यांनी केली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा